मुंबई, 16 सप्टेंबर : राम मंदिराची पहिली वीट शिवसैनिक रचतील असं उद्धव ठाकरेंनी सामनातून स्पष्ट केलं होतं. त्यावर पहिली वीट कोण रचेल ते कळेलच असं मुख्यमंत्री म्हणाले होतं. तर उद्धव ठाकरे यांनी यावर पुन्हा एकदी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हालाच राम मंदिराची पहिली वीट रचण्याचा मान मिळेल असं उद्धव ठाकरे म्हणालेत.