Home /News /news /

भाजपचाच मुख्यमंत्री असेल तर शिवसेनेच्या वाट्याला काय?

भाजपचाच मुख्यमंत्री असेल तर शिवसेनेच्या वाट्याला काय?

अमित शहांनी भाजपच्या सर्व नेत्यांना दिल्लीत बोलावून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. त्यात पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला पाहिजे, असे स्पष्ट आदेश दिले.

    पुणे, 10 जून : भाजप सेनेत जागावाटपाचा 50-50 असा फॉर्म्युला ठरला असला तरी मुख्यमंत्री कोण होणार यासंबंधीचा वाद कायम आहे. पुढचा मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार असा निर्धार अमित शहांच्या बैठकीत भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे युतीत असलेल्या शिवसेनेसा काय मिळणार असा प्रश्न उपस्थित राहतो. अमित शहांनी भाजपच्या सर्व नेत्यांना दिल्लीत बोलावून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. त्यात पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला पाहिजे, असे स्पष्ट आदेश दिले. सुधीर मुनगंटीवारही जाहीरपणे तेच सांगू लागलेत. पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा असेल असं नाशिकमध्ये बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. भाजपच्या या भूमिकेमुळे सेनेच्या गोटात पुन्हा अस्वस्थता पसरली आहे. कारण जागावाटपाआधीच भाजप मुख्यमंत्री पदावर हक्क सांगत असेल तर आम्हाला काय?  असा सवाल सेनेकडून विचारला जाऊ लागला आहे. अर्थात जाहीर वाद नको म्हणून उद्धव ठाकरे मात्र आमचं ठरलंय, एवढंच पालुपद लावताहेत. दरम्यान, जागावाटपाआधीच वाद नको म्हणून रावसाहेब दानवेंनी मात्र काहिशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सेना-भाजपचे नेते आमचं ठरलंय हे कितीही सांगत असले तरी या छोटा भाऊ - मोठा भाऊ हा वाद किमान राज्यात तरी कायम आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जागावाटपावेळी पुन्हा वाद होऊ शकतात...हे नक्की हेही वाचा : Weather Forecast : दिल्लीत उन्हाचा कहर, तर या राज्यांत होणार मुसळधार पाऊस अमित शहांबरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राबद्दल नेमकं काय घडलं? लोकसभेच्या घवघवीत यशानंतर भाजप आणि शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. रविवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसोबत बैठक घेऊन यशाचा कानमंत्र दिला. यानंतर भाजपने राज्यातल्या एकूण 288 विधानभा जागांपैकी तब्बल 228 जागांचं टार्गेट ठेवलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल 228 विधानसभा मतदारसंघात भाजप आणि सेनेला आघाडी मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत या सर्व जागा राखा असे आदेशच अमित शहा यांनी राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना दिले आहेत. या आधीच्या सर्वच निवडणुकींमध्येही अमित शहा यांनी अशाच प्रकारचं टार्गेट ठेवून रणनीती आखली होती. त्यामुळे भाजपचे नेते आता जोमाने कामाला लागले आहेत. आम्ही आता विधानसभा निवडणुकीच्या मिशन मोडमध्ये आलो असून आजपासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे असं मत फडणवीस यांनी रविवारी दिल्लीत व्यक्त केलं होतं. भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणार आहोत. त्याचबरोबर मित्रपक्षांचेही जास्तित जास्त उमेदवार कसे निवडून येतील याची काळजी भाजपचे कार्यकर्ते घेतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर टाकली आहे. SPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत?
    First published:

    Tags: Amit Shah, BJP, CM of maharashtra, Lok sabha election 2019, Shivsena

    पुढील बातम्या