सिंधुदुर्ग, 27 एप्रिल: कोरोनामुळे मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्य बेजार झालं असताना शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. सध्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्यामुळे लॉकडाऊनमध्ये मुंबईत अडकलेल्या कोकणवासियांना मातृभूमीत परत आणण्यावरुन आता शिवसेना-भाजपमध्ये राजकारण सुरु झालं आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे शिवसेना आमदार उदय सामंत आणि भाजपचे आमदार नितेश राणे हे या मुद्द्यावरुन आमने सामने आले आहे.
हेही वाचा.. माऊलीने केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक; म्हणाला, उद्धव ठाकरे लय भारी!
कोकणात येऊ इच्छिणाऱ्या मुंबईकरांना परण आणायची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. मात्र, तशी व्यवस्था कोकणातले सत्ताधारी करत नाहीत, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी 'News18 लोकमत' शी बोलताना केली होती. त्या टीकेला आता सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे शिवसेना आमदार उदय सामंत यांनी प्रत्युतर दिलं आहे. तुम्हाला काही लोक भडकवत असतील, तर भडकू नका असं आवाहन उदय सामंत यांनी मुंबईतील कोकणवासियांना केलं आहे.
सरकारचा निर्णय ज्यावेळी होईल, त्यावेळी तुम्हाला कोकणात आणायला स्वत: पुढाकार घेईन, असं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं आहे.
हेही वाचा..शहरात अडकलेल्या मजुरांना गावची दारं बंदच? सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप नाहीच
स्वत: रस्त्यावर उतरून केली जनजागृती
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जनतेला जागृत करण्यासाठी नितेश राणे हे रस्त्यावर उतरले. त्यांनी जनतेला काही सूचना केल्या. घरी राहून कोरोनाशी लढा आणि प्रशासनाला मदत करा, असे आवाहन त्यांनी केले. 'घरी राहा सुरक्षित राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा', असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, नितेश राणे मुंबईत अडकले असतानाही त्यांनी मुंबईत असतानाही जिल्ह्यात सर्वप्रथम 2 लाख मास्क पाठवून दिले. 2 लाख मास्कचे प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात वाटप करण्यात आले होते. तसेच इथल्या आरोग्य यंत्रणेजवळ पीपीई किट नसल्याचं लक्षात येताच 1 हजार पीपीई किट देखील पाठवले होते.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Nitesh rane, Shiv sena