NRC आणि CAA च्या समर्थनार्थ आता भाजप रस्त्यावर, जनफेरी काढून नागरिकांमध्ये जागृती

NRC आणि CAA च्या समर्थनार्थ आता भाजप रस्त्यावर, जनफेरी काढून नागरिकांमध्ये जागृती

देशहीत आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात सदर कायदा संख्याबळाच्या जोरावर संमत करून घेण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशात आगडोंब उसळलेला असतानाच त्याला टक्कर देण्यासाठी आता सत्ताधारी भाजपचे नेते आणि कार्यकर्तेदेखील मैदानात उतरले आहेत. याची सुरुवात आज ठाण्यातून एक प्रचंड जनफेरी काढून करण्यात आली. देशहीत आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात सदर कायदा संख्याबळाच्या जोरावर संमत करून घेण्यात आला.

सदर कायद्यामुळे देशात असलेल्या मुस्लीम समाजावर अन्याय होत असल्याचे  सांगत मुस्लिम संघटना आणि इतर बुद्धिवाद्यांनी देशात आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. गेले अनेक दिवस चाललेल्या या संघर्षाला अनेक ठिकाणी हिंसेचे गालबोट देखील लागले. या कायद्याबद्दल जनजागृती व्हावी आणि सदर कायद्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज ठाण्यातील भाजप आणि ठाणेकरांनी मिळून विशाल जनफेरीचे आयोजन केले.

या जनफेरीची सुरुवात जांभळी नाका येथील चिंतामणी चौकातून सुरुवात होऊन याची सांगता घंटाळी मैदान येथे झाली. या जनफेरीत मोठ्या प्रमाणात भाजप नेते, कार्यकर्ते आणि ठाणेकर नागरिकांनी भाग घेऊन सदर कायद्याला आपलं पाठिंबा दर्शविला.

इतर बातम्या - महानगरपालिकेत फडणवीस सरकाने केलेला 'हा' कायदा ठाकरे सरकाने बदलला!

Citizenship Act Protests: तिसऱ्या दिवशीही उत्तर प्रदेश पेटलेलेच, हिंसाचारात 13 ठार, बिहार बंदची हाक

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शुक्रवारी काही ठिकाणी हिंसक निदर्शनं झाली. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 13जणांचा मृत्यू झाला आहे. खुद्द पोलीस महासंचालकांनीच याची पुष्टी केली आहे. बिजनोर, संभल, फिरोजाबाद, मेरठ आणि कानपूरमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता आता ती संख्या वाढून 13 वर पोहोचली आहे. उत्तर प्रदेशात 15 जिल्ह्यांमध्ये हिंसक घटना घडल्या. सुधारि नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलनं करण्यात आली. संतप्त जमावाने रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली असून सध्या तणावाचं वातावरण आहे. जमावाकडून पोलिसांच्या गाड्यांसह सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शनिवारी एमआयएम हैदराबादमध्ये आंदोलन करणार आहे. तर दुसरीडे आज राजदकडून बिहार बंदची हाक देण्यात आली आहे.

इतर बातम्या - कशी आहे ठाकरे सरकारची कर्जमाफी, वाचा कोणाला वगळलं?

दरम्यान सध्याची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने 21 जिल्ह्यांमधील इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी उत्तर प्रदेशातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

याशिवाय सीलमपूर, जाफराबाद भागातही निदर्शकांनी रस्ते बंद केले आहेत. दिल्लीतली 7 मेट्रो स्टेशन्स आजही बंद ठेवण्यात आली आहेत. शुक्रवारी उत्तर प्रदेशात गोरखपूर भागात पोलीस आणि आंदोलक यांच्यात चकमक झाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली होती. देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली.

#BREAKING: शेतकऱ्यांचं कर्ज माफ; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2019 09:06 PM IST

ताज्या बातम्या