अमित शहा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार

अमित शहा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार

भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. उद्या संध्याकाळी 6 वाजता शहा मातोश्रीवर जातील.

  • Share this:

मुंबई, 05 जून : भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. उद्या संध्याकाळी 6 वाजता शहा मातोश्रीवर जातील. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत पुन्हा तणाव निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे.मोदी सरकारला 4 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त शहा संपर्क अभियानात भाग घेतायेत. त्याचाच भाग म्हणून ते उद्या मुंबईत येणार आहेत.

या आधी १८ जून २०१७ रोजी राष्ट्रपती निवडणुकीत भाजप उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा मिळवण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची बंद दाराआड ७० मिनिटं भेट झाली होती. एनडीएचचं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यापासून शिवसेनेला दिलेल्या सतत सापत्न वागणूकीमुळे शिवसेना प्रचंड दुखावली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी महापालिका निवडणुकी पूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवेल अशी घोषणा केली. त्याचा परिणाम म्हणजे ग्रामपंचायतपासून ते महापालिका आणि विधान परिषद ते पालघर लोकसभा पोट निवडणूक अशा सर्वच निवडणुकीत शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवली.

या निवडणुकीनंतरही शिवसेना विरूद्ध भाजप असा वाद विकोपाला गेलाय. अशा राजकीय परीस्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुन्हा एकदा मातोश्रीची पायरी चढतायेत. त्यांच्या या हायव्होल्टेज बैठकीनंतर युती बाबत काय निर्णय होतेय. याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2018 09:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...