News18 Lokmat

४३ वर्षांच्या राहुल महाजनने २५ वर्षांच्या मॉडेलशी केले लग्न

आम्ही दोघं एकत्र फार छान दिसतो. ती माझ्या उंचीपेक्षा फक्त ४ इंच लहान आहे. मी ६ फूट २ इंच आहे तर ती ५ फूट १० इंच आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 23, 2018 08:17 PM IST

४३ वर्षांच्या राहुल महाजनने २५ वर्षांच्या मॉडेलशी केले लग्न

दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आणि बिग बॉस सीझन २ चा स्पर्धक राहुल महाजन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे त्याचं तिसरं लग्न. काही वर्षांपूर्वी डिंपी गांगुलीला घटस्फोट दिल्यानंतर राहुलने आता तिसरं लग्न केलं आहे. नताल्या इलीना या २५ वर्षीय मॉडेलशी २० नोव्हेंबरला एका मंदिरात लग्न केलं. नताल्या राहुलपेक्षा १८ वर्षांनी लहान आहे. राहुल आणि नताल्याने मुंबईतील मलबार हिल येथील एका मंदिरात पारंपरिक पद्धतीने लग्न केले. लग्नाच्यावेळी राहुल आणि नताल्याचं कुटुंब उपस्थित होतं.

राहुलने आपल्या तिसऱ्या लग्नाबद्दल एका मुलाखतीत म्हटलं की, मी धुमधाम पद्धतीने जी लग्न केली ती फारशी चालली नाहीत. मी नताल्याला एक वर्षापासून ओळखतो. आम्ही एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. तिला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि मी तिला सर्वप्रकारे मदत करेन. राहुलला यावेळी वयातील अंतराबद्दलही विचारले. आम्ही दोघं एकत्र फार छान दिसतो. ती माझ्या उंचीपेक्षा फक्त ४ इंच लहान आहे. मी ६ फूट २ इंच आहे तर ती ५ फूट १० इंच आहे.

स्वयंवर राहुल का रिअलिटी शोमध्ये राहुलने डिंपी गांगुलीशी लग्न केले. काही महिन्यांनंतर डिंपीने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. २०१० मध्ये राहुल आणि डिंपीचं लग्न झालं. पण अवघ्या तीन वर्षात म्हणजे २०१३ मध्ये दोघांचा घटस्फोटही झाला.

Loading...

घटस्फोटानंतर डिंपीने २७ नोव्हेंबर २०१५ मध्ये रोहित रॉयशी दुसरं लग्न केलं. रोहित हा दुबईत राहणारा व्यावसायिक आहे. कोलकत्यात दोघांनी लग्न केले होते. रोहित आणि डिंपीला एक मुलगी असून तिचं नाव रियाना आहे. डिंपीही बिग बॉसच्या ८ व्या सिझनची स्पर्धक होती. या सिझनमध्ये राहुल महाजननेही एण्ट्री घेतली होती.

राहुलच्या पहिल्या पत्नीनेही त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. श्वेता सिंग आणि राहुलने ऑगस्ट २००६ मध्ये लग्न केलं होतं. राहुल आणि श्वेता लहानपणीचे मित्र होते. दोघांनी एकत्र अमेरिकेत फ्लाइंग स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतले होते. दोघांचा हा प्रेमविवाह होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2018 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...