योगी आदित्यनाथ ते शाहनवाज हुसैन; ही आहे भाजपची स्टार प्रचारकांची लिस्ट

योगी आदित्यनाथ ते शाहनवाज हुसैन; ही आहे भाजपची स्टार प्रचारकांची लिस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्ध्यात आयोजित करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : 2019च्या लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या असताना या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात सध्या निवडणुकांचे रंग आहेत तर चौफेर प्रचारांच्या फैरी सुरू झाल्या आहे. 2018मध्ये झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याने लोकसभेसाठी भाजप कंबर कसून मैदानात उतरली आहे.

संपूर्ण राज्यात प्रचारांचा आणि सभांचा ताफाच सुरू करण्यात आला आहे. यासाठी भाजपने तब्बल 40 स्टार प्रचारकांची लिस्ट काढली आहे. हे स्टार प्रचारक व्यासपीठावरून जनतेची मन जिंकणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

लोकसभेसाठी भाजपच्या स्टार प्रचाराकांची यादी तयार...

- पंतप्रधान नरेंद्र मोदी,

- अमित शाह

- लालकृष्ण अडवाणी

- मुरली मनोहर जोशी

- राजनाथ सिंग

- सुषमा स्वराज

- नितिन गडकरी

- देवेंद्र फडणवीस

- रावसाहेब दानवे पाटील

- पियुष गोयल

- प्रकाश जावडेकर

- रामलाल

- वी.सतिश

- सरोज पांडे

- शिवराजसिंग चौहान

- वसुंधराराजे सिंधिया

- राजीवप्रताप रूडी

- शाहनवाज हुसैन

- मुख्तार अब्बास नक्वी

- योगी आदित्यनाथ

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्ध्यात आयोजित करण्यात आली आहे. वर्ध्यातून लोकसभा प्रचाराला सुरवात होणार आहे अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकात पाटल यांनी कोल्हापुरात दिली आहे. मागील वर्षी पहिली सभा ही वर्ध्यातील स्वलांबी मैदानावर झाली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी गांधी आश्रमाला भेट दिली होती.  28 मार्चला होणाऱ्या या पहिल्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्वावलंबी शाळेच्या मैदानावर ही सभा होणार आहे.

तर शिवसेना-भाजप युतीचा प्रचार शुभारंभ उद्या म्हणजेच रविवारी करवीरनगरी कोल्हापूरमधून होणार आहे. कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर हा प्रचार शुभारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी या मैदानावर सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील महायुतीचे दिग्गज नेते या महामेळाव्याला उपस्थित असणार आहेत.

जवळपास अडीच लाख खुर्च्या या मैदानावर ठेवण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. रविवारी संध्याकाळी 5 वाजता या महामेळाव्याला सुरुवात होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलोस प्रशासनाने कोल्हापूरमध्ये योग्य ती खबरदारी घेतली आहे. तसंच या महामेळाव्यामुळे कोल्हापूर शहरातल्या अनेक वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत.


VIDEO : कांचन कुल यांच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 07:40 PM IST

ताज्या बातम्या