'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख, या दोघांनी महाराष्ट्राची लावली वाट'

'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख, या दोघांनी महाराष्ट्राची लावली वाट'

'म्हातार वयात लोकसभा निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे कशाला उभे राहिले माहिती नाही' अशा शब्दात नितीन गडकरींनी शिंदेंवर घणाघात केला.

  • Share this:

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 16 एप्रिल : भाजपचे नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी आज सोलापूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.' अशा शब्दात नितीन गडकरी यांनी सुशीलकुमार शिंदे आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर खोचक टीका केली.

या सभेमध्ये त्यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यावर आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'म्हातार वयात लोकसभा निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे कशाला उभे राहिले माहिती नाही' अशा शब्दात नितीन गडकरींनी शिंदेंवर घणाघात केला.

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही घणाघात केला. 'मुसलमान, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूरांची गरिबी हटली का? काँग्रेस पक्षाने गरिबी हटवली, ती कार्यकर्ते, नेते, चेले चपाट्यांची गरिबी हटवली.' असंही नितीन गडकरी म्हणाले.

"राजकारण हा आमचा धंदा नाही. राष्ट्रनिर्माणाचे प्रभावी उपकरण आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था 'दिल के टुकडे हुए हजार एक यहा गिरा, एक वहा गिरा.' अशी झाली आहे. ७० वर्षाचा इतिहास हा बेईमानी आणि गद्दारीचा इतिहास आहे."  अशी टीकाही नितीन गडकरी यांनी केली आहे.

दरम्यान, ते पुढे म्हणाले की, 'मी काही फोकनाड नेता नाही. मी जे बोलतो तेच करतो.' असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

हेही वाचा : TikTok वर बंदी : सरकारकडून अ‍ॅपल आणि गुगलला अ‍ॅप काढून टाकण्याच्या सूचना

आणखी काय म्हणाले नितीन गडकरी

- 27 हजार कोटी रुपयांची कामं करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यातील 90% कामाचे भूमिपूजन केलं.

- 8 हजार कोटी रुपयांचा पालखी मार्गाच्या कामाला निवडणुकीनंतर सुरुवात होणार.

- आपण लोक, आपले मुलं, नातू जिवंत असेपर्यंत रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत असे रस्ते बांधतो.

- कामाच्या मंजुरीसाठी एकाही ठेकेदाराला मला भेटावे लागत नाही.

- बुद्ध सर्किट नावाने योजना करुन 10 हजार कोटीचे रस्ते बांधले.

- गौतम बुध्दांना आदरांजली वाहणारे पहिले सरकार केवळ मोदी सरकार आहे.

- आता बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्रीला कोणत्याही दिवशी जाऊ शकता.

- देशात 15 एक्स्प्रेस हायवे बांधतो आहे.

- 14 लेनचा दिल्ली ते मेरठ रस्ता बांधतो आहे.

- दिल्ली ते मुंबई अंतर केवळ 12 तासात येणार.

- गरिबाला जात, पात, धर्म, पंथ नसते.

- गरिबी, उपासमार ही देशातील सर्वात मोठी समस्या आहे.

- म्हैसाल आणि टेंभूला पाणी आणण्याचं काम भाजप सरकारनं केलं.

- 18% सिंचनावरून 48% वर नेण्याचा प्रयत्न केला.

- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही.

- कॅनॉलऐवजी पाईपलाईनने पाणी देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही.

- भारतात लॉजिस्टीक कॉस्ट 18 % आहे.

- येणाऱ्या काळात सोलापुरात ड्राय पोर्ट करणार.

- राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना चिंता आहे. ती त्यांच्या मुलांना रोजगार कसा मिळेल याची.

- हवेतून चालणारी डबल डेकर बस आणावी.

- मेट्रोच्या खर्चा पेक्षा ५० कोटी रुपये किलोमीटर

- भारत जगातील नंबर एकची सुपर इकॉनॉमी झाल्याशिवाय राहणार नाही.

- भारत पाकिस्तान झालं तेव्हा सहा नद्या होत्या. त्यातील 3 भारताला 3 पाकिस्तानला पाणी मिळत आहे.

- पाकिस्तान तडफडून मेल्याशिवाय राहणार नाही.

- दहशतवादी हल्ले थांबवा अन्यथा पाण्यासाठी तडफडून मराल.

नितीन गडकरींची विरोधकांवर मिश्किल टिप्पणी; काय म्हणाले गडकरी पाहा VIDEO

First published: April 16, 2019, 2:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading