भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित अडकणार लग्नाच्या बेडीत

भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित अडकणार लग्नाच्या बेडीत

हिना गावित यांनी 2014मध्ये पहिल्यांदाच नंदुरबारमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला होता.

  • Share this:

नंदुरबार 27 फेब्रुवारी : भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला. डॉ. तुषार वळवी यांच्याशी त्या विवाहबद्ध होणार आहेत. डॉ. वळवी हे MD असून मुंबईत डॉक्टर आहे. व्यवसायासाठी ते मुंबईत राहत असले तरी नंदूरबार जिल्ह्यातलं हातधुई हे त्यांचं मुळ गाव आहे. मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थित त्यांचा साखरपुडा झाला. माजी मंत्री विजय गावित यांच्या त्या कन्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले विजय गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नंदुरबारमधलं राजकीय समिकरण बदललं होतं. डॉ. हिना गावित यांचा जन्म 26 जून 1987 मध्ये झाला. त्यांचंही शिक्षण MBBS, MD असं झालंय. हिना गावित यांनी 2014मध्ये पहिल्यांदाच नंदुरबारमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला होता. माणिकराव गावित हे सलग 9 वेळा खासदार राहिलेले होते.

मराठीची हेळसांड थांबविण्याचा संकल्प तरी करता येईल?

त्यामुळे त्यांच्या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्रा लक्ष लागलं होतं. संसदेत त्या अतिशय सक्रिय असतात. त्यामुळे उत्कृष्ट खासदार म्हणूनही त्यांना पुरस्कार मिळाला होता. हिना गावित यांचा अनेक संसदीय समित्यांमध्ये समावेश झालेला असून त्यानिमित्त त्यांनी अनेक देशांना भेटीही दिल्या आहेत.

हेही वाचा...

ठाकरे सरकारचा भाजपला आणखी एक दणका, 'हा' निर्णय केला रद्द

...आणि खासदार नवनीत राणांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2020 12:32 PM IST

ताज्या बातम्या