उदयनराजे भोसले यांच्या एका दगडात दोन शिकार, 'या' मंत्र्यांवर केली जहरी टीका

उदयनराजे भोसले यांच्या एका दगडात दोन शिकार, 'या' मंत्र्यांवर केली जहरी टीका

राजकारणात फाटाफुटी दररोज होत राहतात. फूट कशात पडणार, हे सांगायला मी ज्योतिषी नाही.

  • Share this:

सातारा, 16 डिसेंबर: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhosale) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. येत्या चार महिन्यांत भाजपचे आमदार फुटणार असा दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आणि मराठा आरक्षणावर आमचा अभ्यास नाही, असं म्हणणारे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी साताऱ्यात चांगलाच समाचार घेतला आहे.

हेही वाचा...‘दुभंगलेली मनं पुन्हा कधीही जुळून येत नाहीत’ उदयनराजेंची गावकऱ्यांना भावनिक साद

उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजकारणात फाटाफुटी दररोज होत राहतात. फूट कशात पडणार हे सांगायला मी ज्योतिषी नाही. काय होईल काय नाही देवाला माहीत. पण त्यांनी सरकार चांगल टिकवलं म्हणजे झालं, असा टोला उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांना उद्देशून लगावला.

छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उदयनराजे म्हणाले, त्यांचा गाढा अभ्यास आहे. आम्ही हे मान्य करतो. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स काय आहे, मला चांगलं माहीत आहे. ते वयाने मोठे आहेत. म्हणून मी त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

मराठा समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे, यात अभ्यास काय करायचा? ज्यांना अभ्यास करायला हवा होता. त्यांनी माझी बुद्धी काढली. त्या तज्ज्ञ लोकांनी याचं उत्तर द्यावं. माझा अभ्यास जर असता तर अनेकांनी केलं तसं मला पण करता आलं असतं, असा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा...पुण्यात कात्रज ते नवले पूलदरम्यान ट्रकचे ब्रेक फेल, नंतर बघा काय झालं ते...

याशिवाय उदयराजे भोसले यांनी पाकिस्तानात लागू करण्यात आलेल्या बलात्काऱ्यांना नपुंसक करण्याच्या कायद्यावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भारतात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. बलात्काऱ्याला नपुंसक करण्याचा कायदा भारतात मागेच आणायला हवा होता. बलात्कारासारखा प्रसंग कोणावर येऊ नये, असंही मत उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केलं

Published by: Sandip Parolekar
First published: December 16, 2020, 4:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या