Home /News /news /

BJP खासदारानं फेसबुकवर शेअर केला बंदूक हातात घेतलेला फोटो, यूजर्सने केलं भन्नाट ट्रोल

BJP खासदारानं फेसबुकवर शेअर केला बंदूक हातात घेतलेला फोटो, यूजर्सने केलं भन्नाट ट्रोल

    जोगिंद्रनगर (मंडी), 05 मे : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील भाजपाचे (BJP) खासदार रामस्वरूप शर्मा (Ramswaroop Sharma) यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो खासदारांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या फोटोंची धमाल चर्चा सुरू आहे. हा फोटो शेअर करताना रामस्वरूप शर्मा यांनी फेसबुक लिहलं आहे की, 'घरी जलपेहडमध्ये मी माझी लायसन्स 12 बोर गन साफ करत आणि निरीक्षण करत' असं कॅप्शन लिहित त्यांनी एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काही यूजर्सनी लिहलं की, एका यूजरने लिहिलं की 'कदाचित तुम्ही कोरोनाला उडवण्याचा विचार करीत आहात'. दुसर्‍या एका यूजरने लिहिलं की कोरोनाची आता काही खैर नाही. त्याचप्रमाणे बरेच यूजर खासदाराचा निषेध करतानाही दिसले. एका यूजरने लिहिलं की , "भाऊ, विनाशकाल विपरीत बुद्धि" या व्यतिरिक्त दुसर्‍या यूजरने लिहिलं की "भाऊ, हा तो बंदूक वाला नेता आहे, त्याला क्वारंटाईन, ज्यांना आवाज उठवाचाय त्यांनी जावा." त्याचबरोबर काही यूजरही या पोस्टला पाकिस्तानशी लिंक करून भाष्य केलं आहे. यापूर्वी खासदार रामस्वरूप शर्मा यांच्यात दिल्ली (जोगिंदरनगर) येथून घरी परतण्यावरून लॉकडाऊन दरम्यान वाद झाला होता. यावेळी ते कसे घरी आले याविषयी लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते, तर हिमाचलमधील इतर लोक अजूनही बाह्य राज्यात अडकले आहेत. यावर खासदार यांनी स्पष्टीकरणही दिलं की, ते दिल्लीहून परत आले आहेत आणि क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. ते दिल्लीहून आपल्या लोकांना मदत करण्यासाठी आले आहेत.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या