Home /News /news /

VIDEO: भाजप आमदाराची दादागिर कॅमेऱ्यात कैद, शुल्लक कारणावरून शेजाऱ्याला मारलं

VIDEO: भाजप आमदाराची दादागिर कॅमेऱ्यात कैद, शुल्लक कारणावरून शेजाऱ्याला मारलं

या संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर लोक टीका करत आहेत.

    गोरखपूर, 14 जानेवारी : भाजपचे आमदार विपिन सिंह यांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गोरखपूर जिल्ह्यातल्या एका किरकोळ प्रकरणावरून त्यांनी थेट शेजाऱ्याला मारहाण केली. या संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर लोक टीका करत आहेत. शेजारी काम करणाऱ्या एका व्यक्तीचा त्रास झाल्याने त्याला दादागिरी दाखवत विपिन सिंह यांनी मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली गेली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, असाच एक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी केला आहे. त्यांनी काही कामगारांना मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. कुर्लाजवळच्या चुनाभट्टी भागात रस्त्याचं काम सुरू होतं. तिथे 4 कामगारांना कप्तान मलिकांनी मारहाण केली. यापुढे इथे दिसलात तर हाय-पाय कापून ठेवीन, अशी धमकीही त्यांनी दिली. रस्त्यावर सुरू असलेल्या कामवरून कप्तान मलिक मारहाण करताना व्हिडओत दिसले. रस्त्यावर एका ठिकाणी खोजकाम केलं होते आणि त्याठिकाणी फायबर केबलचं काम सुरू होतं. याठीकाणी मलिक आले आणि त्यांच्याकडून वर्क ऑर्डर मागत होते. मात्र, यांच्याकडे वर्क ऑर्डर नसल्याचा आरोप करत मलिक यांनी त्यांना मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांना धमकी देखील दिली. जा पोलीस ठाण्यात जा आणि माझ्या विरोधात तक्रार कर, यापुढे इथे दिसलात तर हात पाय कापेन.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या