भाजप आमदाराने प्रश्न विचारणाऱ्याला म्हटलं 'ये माकडा खाली बस', पुढे काय झालं तुम्हीच वाचा!

शिरूरच्या आजी-माजी आमदारांमध्ये रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत एक शीतयुद्ध सुरू झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 02:30 PM IST

भाजप आमदाराने प्रश्न विचारणाऱ्याला म्हटलं 'ये माकडा खाली बस', पुढे काय झालं तुम्हीच वाचा!

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

शिरूर, 04 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निमित्तानं तुम्हाला शिरूर तालुक्यातील एका माकडांच्या गावाबद्दल माहिती देणार आहोत. एकमेकांचे पक्के राजकीय विरोधक आणि २०१९ चे उमेदवार असलेलेल्या शिरूरच्या आजी-माजी आमदारांमध्ये रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत एक शीतयुद्ध सुरू झालं आहे. त्याचा शेवट निवडणुकांनंतर होणार आहे हे मात्र नक्की. भाजपचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांनी कुरुळी गावच्या एका  सभासदाला भर सभेत "माकड" म्हटलं आणि यामुळे सभासद चिडले आणि माकडांच्या गावात आमदारांना येऊच देणार नाही असा या गावकऱ्यांनी निर्णयही घेतला.

शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अशोक पवार यांनी कारखानदारी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत येत असल्याचा आरोप केला होता. यावर कारखान्याकडून पॉवर परचेस करार करण्यात आलाच नसल्याचे सांगितलं. याला कारखाना प्रशासन दोषी आहे आणि त्याचं खापर सरकारच्या डोक्यावर फोडलं जात असल्याचा पलटवार आमदार बाबुराव पाचर्णें यांनी केला.

अंबादास बोरकर या सभासदाने आमदारांना प्रतिप्रश्न केल्याने आमदार बाबुराव पाचर्णे भलतेच चिडले आणि मग या सभासदाला 'ये माकडा खाली बस' असा अपशब्द वापरला. यावर सभासद आणि उपस्थित भलतेच संतापले. आमदारांना गाव बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांकडून घेण्यात आला आहे.

इतर बातम्या - भारतीय हवाई दलाची मोठी चूक! आपलंच हेलिकॉप्टर पाडल्याचा IAF प्रमुखांचा खुलासा

Loading...

भरसभेत कारखान्याच्याच सभासदाला माकडाची उपमा देण्याचं पाप आमदार बाबूराव पाचर्णें यांनी केल्याची निषेध सभा घेत कुरुळी गावातील नागरीकांनी बंद पाळला. याबाबत आमदार पाचर्णें यांनी शेतक-यांना माकडाची उपमा दिल्या प्रकरणी माफी मागावी अन्यथा या माकडांच्या गावात त्यांना पायी ठेवू देणार नाही असा इशाराच ग्रामस्थांनी दिला आहे. पण आमदार बाबुराव पाचर्णे यांनी यावर माध्यमांशी बोलताना हा सभासद सभेत दारू पिला होता आणि माकडचाळे करत होता म्हणून आपण असं बोललो अशी सारवासारव केली.

इतर बातम्या - चंद्रकांत पाटलांविरोधात राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन, जाहीर केली भूमिका

विधानसभेच्या तोंडावर मतदारांनाच विद्यमान आमदारांकडून अशी खालच्या पातळीची वागणूक दिल्याने शेतकरी वर्गासह तालुक्यात नाराजीचा सुरू पसरला आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांनी भाजप आमदार बाबूराव पाचर्णें यांना लक्ष करत ज्या सभासदांच्या कष्टातून घोडगंगा साखर कारखाना उभा राहिला त्याच कारखान्यांच्या सभासदाला माकडाची उपमा देणं गैर असल्याचं म्हणत आमदार पाचर्णेंना लक्ष केलं आहे.

इतर बातम्या - मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचा राडा, आपल्याच उमेदवाराची फोडली गाडी!

ऐन विधानसभा निवडणुकीत घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधाळाने संपुर्ण तालुक्यातील राजकारणाने एक वेगळं वळण घेतलं. या वक्तव्याचं राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिरूरच्या विधानसभा निवडणूक प्रचारात "ये, माकडा खाली बस" प्रकरण चांगलंच गाजनार आहे. हे मात्र नक्की. फक्त या गोष्टीचा कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार हे मात्र पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 02:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...