मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /भाजप आमदाराची शरद पवारांवर खरमरीत टीका, उस्मानाबादमध्ये पुन्हा राजकारण तापलं

भाजप आमदाराची शरद पवारांवर खरमरीत टीका, उस्मानाबादमध्ये पुन्हा राजकारण तापलं

भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली असून आगामी काळात स्थानिक राजकारणात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली असून आगामी काळात स्थानिक राजकारणात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली असून आगामी काळात स्थानिक राजकारणात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद, 13 जुलै : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यांच्या टीकेवरून राज्यभरात गोंधळ माजला असतानाच त्या गोंधळाचा आवाज शांत होतो न होतो तोपर्यंतच आता भाजपच्या आणखी एका आमदाराने शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

'तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले असले तरी शरद पवार यांच्या पक्षाला राज्यात एकदाही बहुमत घेऊन सत्ता स्थापन करता आली नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. त्यांची टीका पाहून ते राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष असले तरी इतर पक्षाचे प्रवक्ते वाटत आहेत,' अशी टीका भाजप आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

सुजितसिंह यांनी ही टीका करताना शरद पवार यांनी सामना दैनिकाला जी मुलखातदिली आहे त्यावर ही तोफ डागली आहे. आता सुजितसिंह यांच्या टीकेला ही भूम परंडाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार व गोदावरी विकास महामंडळचे माजी अध्यक्ष राहुल मोटे यांनीही उत्तर दिले असून सुजितसिंह यांची पवार यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. कोणीही पवार यांच्यावर टीका केली की त्यांना मोठेपणा वाटतो, या भावनेतूनच ठाकूर यांनी टीका केली आहे, असा पलटवार राहुल मोटे यांनी केला आहे.

सुजितसिंह ठाकूर यांनी अगोदर जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही मोटे यांनी दिले आहे. मोटे यांच्या प्रत्युत्तरानंतर भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली असून आगामी काळात स्थानिक राजकारणात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: NCP, Sharad pawar