मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'भाषणाचा आशय हा राष्ट्रप्रेमाशी निगडीत', राम कदमांनी केली राज्यपालांची पाठराखण

'भाषणाचा आशय हा राष्ट्रप्रेमाशी निगडीत', राम कदमांनी केली राज्यपालांची पाठराखण

अशा त्यागी आणि समर्पित जीवन जगणारे या राष्ट्रावर प्रेम करणारे प्रखर व्यक्तिमत असे ते आहे.

अशा त्यागी आणि समर्पित जीवन जगणारे या राष्ट्रावर प्रेम करणारे प्रखर व्यक्तिमत असे ते आहे.

अशा त्यागी आणि समर्पित जीवन जगणारे या राष्ट्रावर प्रेम करणारे प्रखर व्यक्तिमत असे ते आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 30 जुलै : मुंबईतून जर गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकलं तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. पण, 'त्यांचे भाषण हे कापण्यात आले आहे. त्यांच्या भाषणाचा आशय हा राष्ट्रप्रेमाशी निगडीत आहे'असं म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी जोरदार पाठराखण केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडले आहे. त्यांच्या विधानावरून राजकीय सामना रंगला आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

'मुळामध्ये राज्यपालांचं अर्धवट वाक्य कापून लावलं आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा अर्थ हा वेगळा निघणार आहे. त्याच्यामुळे त्या वाक्याच्या आधी काय बोलले, त्या वाक्याच्या नंतर काय बोलले, ते पूर्ण भाषण ऐकलं तर त्याचा आशय लक्षात येईल. मुंबई ही सगळ्यांची आहे, मराठी माणसाची आहे. मुंबईमध्ये प्रत्येकाचे योगदान आहे. राज्यपालांच्या भाषणाचा आशय आपण हे समजून घेतला पाहिजे, मुंबईत सर्वांचं योगदान आहे, त्या दृष्टीने त्यांचे वक्तव्य आहे. त्या वक्तव्याला आपण राजकीय रंग देण्याची गरज नाही, असं राम कदम म्हणाले.

('..तर त्यांच्या गाड्यांचा चुराडा करू'; छत्रपतींच्या अवमानामुळे भडकले संतोष बांगर)

'त्यांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पित केले आहे. 18-20 तास ते राज्यपाल म्हणून काम करत आहे. एकाठिकाणी आपण पाहिलं की माजी मुख्यमंत्री हे लोकांना भेटण्यासाठी तयार नव्हते, आमदारांना भेटत नव्हते. अशा वातावरणात राज्यपाल हे लोकांना भेट होते. अशा त्यागी आणि समर्पित जीवन जगणारे या राष्ट्रावर प्रेम करणारे प्रखर व्यक्तिमत असे ते आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाचा आशय हा राष्ट्रप्रेमाशी निगडीत आहे' असा दावाच कदम यांनी केला.

(चूलच नव्हे तर स्वयंपाकघरातील गॅसही देतो आजारांना आमंत्रण; भयंकर आजाराचा धोका)

'मराठी माणसाचं योगदान कधीच नाकारत येत नाही. त्यांचे वाक्य हे कापून लावण्यात आले आहे. त्यांचे कर्तृत्व पाहता त्यांचे समर्पक जीवन पाहता, या राज्यावर देशावर प्रेम पाहता त्यांचे भाषण ऐकले पाहिजे, त्यांचे भाषण पूर्ण ऐकलं शिवाय बोलणे योग्य ठरणार नाही, असंही राम कदम म्हणाले.

काय म्हणाले राज्यपाल?

'मी अनेक जणांना सांगत असतो, महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती लोकांना काढून टाका किंवा राजस्थानी लोकांनाही काढू टाका, जर गुजराती आणि राजस्थानी लोक सोडून गेले तर तुमच्याकडे कोणतेच पैसे उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असं विधानच राज्यपालांनी केलं.

First published: