भाजप आमदार राहुल कुल यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट

भाजप आमदार राहुल कुल यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

  • Share this:

सुमित सोनवणे, दौंड, 26 मे : राज्यात राज्यपाल यांना भेटी देण्याचे सत्र सुरू असतानाच दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दौंड तालुक्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली आहे.

कोरोनाचा सामना करत असताना संचारबंदीमुळे गोर गरीब जनता, कामगार, कष्टकरी,मजूर, व हातावर पोट असलेल्या छोट्या मोठया विक्रेत्यांचा समस्यांची दखल घेऊन शासनाने लवकरात लवकर विशेष पॅकेज जाहीर करावे तसेच प्रशासन आणि शासन यामध्ये समन्वय साधत योग्य निर्णय घेण्यात यावेत. पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभागावरील ताण कमी करावा, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे अशी विनंती आमदार राहुल कुल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.

यावेळी राहुल कुल यांनी कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात स्थानिक पातळीवर सुरु असलेल्या विविध उपाययोजनांसंदर्भात राज्यपालांना माहिती दिली. यावेळी भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे हेदेखील उपस्थित होते.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 26, 2020, 11:59 PM IST
Tags: BJP

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading