मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भाजप आमदाराचा मध्यवर्ती बँकेवर भ्रष्टाचाराचा आरोप, संचालक म्हणे, 'तुमच्यावरच 420 चा गुन्हा दाखल'

भाजप आमदाराचा मध्यवर्ती बँकेवर भ्रष्टाचाराचा आरोप, संचालक म्हणे, 'तुमच्यावरच 420 चा गुन्हा दाखल'

'केंद्रात भाजपचे सरकार असून त्यांनी आमच्या बँकेवर ईडीची चौकशी करावी आम्ही पूर्ण चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत'

'केंद्रात भाजपचे सरकार असून त्यांनी आमच्या बँकेवर ईडीची चौकशी करावी आम्ही पूर्ण चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत'

'केंद्रात भाजपचे सरकार असून त्यांनी आमच्या बँकेवर ईडीची चौकशी करावी आम्ही पूर्ण चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत'

अमरावती, 21 जुलै : सहकार क्षेत्रात शासनाने दिलेल्या नियमानुसार व्यवहार केले जाते आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये अंधाधुंदी कारभार सुरू असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी केला. त्यांच्या आरोपांना माजी आमदार आणि बँकेचे संचालक वीरेंद्र जगताप यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची 2015 मध्ये मुदत संपली आहे. 5 वर्ष संचालकांची मुदत असताना निवडणूक प्रकिया राबविण्यात आली नाही. संचालक मंडळ नियमाला डावलून कामे करीत असल्याने शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा झालेला नाही. संचालक मनमर्जी राजकारण करीत आहे. कोरोनाकाळात अनावश्यक खर्च न करण्याचा शासनाचा आदेश असताना सॉफ्टवेअरकरिता निविदा मागविण्यात आल्यात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला गेला नसल्याचे आरोप आमदार प्रताप अडसड यांनी केले आहे.

लग्न जमवताना मॅट्रिमोनियल साईटवर होऊ शकते मोठी फसवणूक, 3 गोष्टी लक्षात ठेवा!

विशेष म्हणजे, आमदार प्रताप अडसड यांच्यासह कुटुंबातील दोघांवर फसवणुकीचा  420 चा गुन्हा दाखल आहे. ते स्वतः न्यायालयातून जामिनावर बाहेर आहे.

'आमच्यावर एकही गुन्हा नाही. केंद्रात भाजपचे सरकार असून त्यांनी आमच्या बँकेवर ईडीची चौकशी करावी आम्ही पूर्ण चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, पण त्यांनी सुडाचे राजकारण करू नये, असे सांगत बँकेचे संचालक आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी संपूर्ण भ्रष्टाचाराच्या आरोपाचे खंडन केले आहे.

मुंबईत महिलेला तब्बल 11 लाखांना लुटले, पद्धत पाहून पोलीसही गेले चक्रावून!

तसंच, आमदार अडसड यांच्या कुटुंबीयावर सूत गिरणी बुडवण्याचे आरोप आहे. चेक बाऊन्स प्रकरणी गुन्हेही दाखल आहे. सूडबुद्धीने आमच्यावर आरोप केले जात आहे. आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर केंद्र सरकारने न्यायालयीन चौकशी करावी, असंही जगताप यांनी सांगितलं.

First published:

Tags: अमरावती