बंगळुरू,ता.17 मे: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडींनी नाट्यमय वळण घेतलं. काँग्रेस आणि जेडीएसचे सर्व आमदार हैदराबादमध्ये असून त्यांच्या सकुशल वापसीसाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या खुद्द हैदराबादमध्ये जात आहेत. या सर्व आमदारांना भाजपची हवाही लागू न देता दुपारी 4 वाजता विधानसभेत हजर करावं लागणार आहे. त्यामुळं पुढचे काही तास भाजप आणि काँग्रेससाठी जीवन मरणाचे आहेत.
दुसऱ्या घटनेत राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलीय. संकेतानुसार सभागृहातल्या सर्वात ज्येष्ठ सदस्यांची नियुक्ती या पदावर केली जाते. 71 वर्षांचे काँग्रेसचे आमदार आर.व्ही.देशपांडे हे सभागृहातले सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना डावलून बोपय्यांची नियुक्ती केल्यानं राज्यपालांच्या निर्णयावर काँग्रेस आणि जेडीएसने टीका केलीय.
या निर्णयाविरोधात काँग्रेस पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. अध्यक्ष हे हंगामी असले तरी उद्याच्या विश्वास दर्शक ठारावाच्या वेळी त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळेच काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Bopaiah, Congress, Karnatak, MLA, Pro tem speaker, Suprim court, कर्नाटक, काँग्रेस, काँग्रेस भाजप, जेडीएस, बहुमत, बोपय्या, विधानसभा, सिद्धरामय्या, हंगामी अध्यक्ष