भाजपच्या नेत्याने राज ठाकरेंच्या घरी जाऊन घेतली भेट, राजकीय चर्चांणा उधाण

भाजपच्या नेत्याने राज ठाकरेंच्या घरी जाऊन घेतली भेट, राजकीय चर्चांणा उधाण

या बैठकीमध्ये राज्यातील सध्याचे राजकीय चित्र आणि राज यांची येत्या काळात ठरणारी भूमिका यावर चर्चा झाल्याचं कळतंय.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी कृष्णकुंजवर जाऊन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी भेट घेतली. यावेळी  दोन्ही नेत्यांमध्ये बैठकही झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आशिष शेलार यांनी आज संध्याकाळी राज ठाकरे यांच्या दादर येथील 'कृष्णकुंज' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. या बैठकीमध्ये राज्यातील सध्याचे राजकीय चित्र आणि राज यांची येत्या काळात ठरणारी भूमिका यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

परंतु, ही मैत्रीपूर्ण भेट असल्याची माहिती देण्यात आली आहे.  याआधीही आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी पुण्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये मनसेचं पुढील महाअधिवेशन 23 जानेवारीला मुंबईत होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिनी हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला राज्यभरातील 1 लाख कार्यकर्ते जमा करण्याचं पक्षाचं उद्दिष्ट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज ठाकरेंनी CAA आणि NRC बद्दल जाहीर केली मनसेची भूमिका

देशातील आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यात अमित शहा यशस्वी झाले आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. देशाची लोकसंख्या आधीच 125 कोटी असताना अजून बाहेरच्या लोकांना नागरिकत्व का द्यायचं?' असा प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.

'आधार कार्ड वापरून मतदान करू शकतो. मग आधार कार्डवर नागरिकत्व का सिद्ध होऊ शकत नाही. पण जे मोर्चे काढत आहेत, तोडफोड सुरू आहे, त्यांना तरी या कायद्याबद्दल नीट माहिती आहे का? जे वर्षानुवर्ष देशात राहात आहेत त्यांना का असुरक्षित वाटावं? भारत हा धर्मशाळा नाही. जे घुसखोर त्यांना हाकललंच पाहिजे,' अशी आक्रमक भूमिकाही राज ठाकरे यांनी घेतली आहे.

नोटबंदीसारखाच या कायद्यातही गोंधळ

'नोटबंदीनंतर देशात जे गोंधळाचं वातावरण तयार झालं तसंच आताही होत आहे. कारण या कायद्यातच गोंधळ आहे. राज्यातील मराठी मुसलमान शांत आहेत. त्यांची रोजी रोटी इथेच आहे. सरकार घुसखोर आणि शरणार्थी कसे ओळखणार?' असा सवाल करत राज ठाकरे यांनी या कायद्यातील तरतुदींवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2019 08:49 PM IST

ताज्या बातम्या