गुजरात निकालावरून आ. अनिल गोटेंचा भाजपवर 'लेटरबॉम्ब'!

गुजरात निकालावरून आ. अनिल गोटेंचा भाजपवर 'लेटरबॉम्ब'!

गुजरातच्या विधानसभा निकालावरून भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. आमदार अनिल गोटे यांनी गुजरात निकालावरून धडा घ्या, अशा आशयाचं एक खुलं पत्रच भाजपच्या तमाम पक्ष कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना लिहिलंय.

  • Share this:

20 डिसेंबर, नागपूर : गुजरातच्या विधानसभा निकालावरून भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. आमदार अनिल गोटे यांनी गुजरात निकालावरून धडा घ्या, अशा आशयाचं एक खुलं पत्रच भाजपच्या तमाम पक्ष कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना लिहिलंय. अनिल गोटेंच्या या लेटरबॉम्ब नंतर भाजपमधील नाराजांची यादी दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं दिसतंय.

याआधीही भाजपच्या अनेक नेत्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे. खासदार नाना पटोलेंनी तर पक्ष सोडून आपली नाराजी जाहीर केली आहे. त्यानंतर आशिष देशमुख यांनीही विदर्भाच्या मुद्यावरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन आपली नाराजी व्यक्त केलीय. आता आमदार अनिल गोटे यांनीही घरचा आहेर दिला आहे. एकनाथ खडसे तर नागरपूरच्या अधिवेशनात रोजच सरकारविरोधात उघडपणे बोलत असतात.

पत्रात अनिल गोटे नेमकं काय म्हणाले ?

‘सामान्य माणसाला 'गृहित' धरता येत नाही, हेच गुजरात निकालाने दाखवून दिलं आहे. नव्यानं पक्षात येणाऱ्यांच्या आरत्या ओवाळायच्या आणि पक्ष कार्यकर्त्यांना 'घरच्या गाईचे गोऱ्हे' अशी वागणूक द्यायची. अशा वर्तणुकीचा हा फटका आहे. आपल्याला मिळालेली सत्ता कायम आहे अशा गैरसमजात लाटेवर स्वार झालेल्यांच्या डोळ्यात या निकालानं अंजन घातलं आहे. वर्षभरात आपल्या पालिकेच्या निवडणुका आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी काय केलं, असं विचारण्यापेक्षा राज्यात आपली सत्ता असताना आपण काय केलं, हे जनतेसमोर ठसठशीत मांडता आलं पाहिजे.’

राष्ट्रीय स्तरावरही यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी, वरुण गांधी, लालकृष्ण अडवाणी या ज्येष्ठ नेत्यांनी यापूर्वीच मोदी सरकारच्या राज्यकारभारावर ताशेरे ओढलेत. नाना पटोलेंनी तर थेट राजीनामाच दिलाय. एकूणच कायतर भाजपमधील नाराजांची यादी वाढतच चाललीये.

First published: December 20, 2017, 9:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading