News18 Lokmat

विदर्भाच्या प्रश्नांवरून भाजप आमदाराचांच फडणवीस सरकारला घरचा आहेर !

गपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांकडं सरकारचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप भाजप आमदारांनी केलाय. भाजप आमदारांनी स्वतःच्याच सरकारवर नाराजी व्यक्त केलीये. विदर्भातल्या विकासयोजना, हलबांचं आरक्षण, शिक्षकांचे प्रश्न अनुत्तरितच असल्याचं भाजप आमदारांचं म्हणणं आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 15, 2017 10:14 PM IST

विदर्भाच्या प्रश्नांवरून भाजप आमदाराचांच फडणवीस सरकारला घरचा आहेर !

15 डिसेंबर, नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांकडं सरकारचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप भाजप आमदारांनी केलाय. भाजप आमदारांनी स्वतःच्याच सरकारवर नाराजी व्यक्त केलीये. विदर्भातल्या विकासयोजना, हलबांचं आरक्षण, शिक्षकांचे प्रश्न अनुत्तरितच असल्याचं भाजप आमदारांचं म्हणणं आहे. जर विदर्भाचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात सुटणार नसतील तर नागपुरातील अधिवेशनाचा काय फायदा असा सवालच आमदारांनी उपस्थित केलाय. या आमदारांच्या विरोधामुळे भाजपची अडचण वाढली आहे.

भाजपचे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन फार्स असल्याचे सांगत सरकारवर टीकेची झोत उडवली. मेट्रो, मिहान, स्मार्ट सिटी या प्रोजेक्टची गरज काय शेतकरी हिताचे दुर्लक्ष का ? असा सल्लाही देशमुख यांनी दिलाय. तर शिक्षकांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचे भाजपचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी सांगत सरकारला घरचा आहेर दिलाय.

हा वाद संपत नाही तोच हलबांना अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा न मिळाल्यास राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरातीलच या भाजप आमदारांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवल्याने फडणवीस सरकार चांगलंच अडचणीत आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 10:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...