अटलजींच्या श्रद्धांजली सभेत मंत्र्यांचा निर्लज्जपणा, व्यासपीठावरच हास्याचे फवारे

अटलजींच्या श्रद्धांजली सभेत मंत्र्यांचा निर्लज्जपणा, व्यासपीठावरच हास्याचे फवारे

छत्तीसगडमध्ये झालेल्या अशाच एका श्रद्धांजली सभेत भाजपच्या मंत्र्यांचा निर्लज्जपणा समोर आला. दोन मंत्री हास्यविनोदात रंगल्याच व्हिडीओ व्हायरल झालाय.

  • Share this:

रायपूर,ता.23 ऑगस्ट : भाजपतर्फे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश सर्व देशभर नेण्यात येत आहेत आणि श्रद्धांजली सभेचं आयोजनही करण्यात येतेय. छत्तीसगडमध्ये झालेल्या अशाच एका श्रद्धांजली सभेत भाजपच्या मंत्र्यांचा निर्लज्जपणा समोर आला. या कार्यक्रमाला बृजमोहन अग्रवाल आणि अजय चंद्राकर हे दोन मंत्री उपस्थित होते. कार्यक्रमाचं गांभीर्य लक्षात न घेता ते व्यासपीठावरच हास्यविनोदात गुंग झाला. त्यांच्या जवळच बसलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी या दोघांना गप्प केलं. या घटनेचा फोटो आणि व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. भाजपच्या मंत्र्यांना किमान कार्यक्रमाचं भान राहू नये यावर तीव्र टीका होत आहे. तर मंत्र्यांना समज दिल्याचं स्पष्टीकरण भाजपने दिलंय.

एका मंत्र्यांनी दुसऱ्या मंत्र्याला मोबाईलवर काही दाखवलं आणि दोघही जारजोरात हासायला लागे. काँग्रेसने या गटनेवर तीव्र आक्षेप घेतला असून मंत्र्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केलीय. तर येणाऱ्या निवडणूकीच प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने डॅमेजकंट्रोल करण्याचा निर्णय घेत मंत्र्यांना तंबी दिल्याचं जाहीर केलं.

संध्याकाळी सहा नंतर फोनच बंद करा, अमेझॉनच्या बॉसचा नवा आदेश

First published: August 23, 2018, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading