भाजपच्या अनेक खासदारांचा दाऊदशी संबंध, राष्ट्रवादी नेत्याचा खळबळजनक आरोप

भाजपच्या अनेक खासदारांचा दाऊदशी संबंध, राष्ट्रवादी नेत्याचा खळबळजनक आरोप

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित लोक भाजपमध्ये आहेत, तसेच भाजपच्या आयटी सेलमध्ये 'सीआयए'चे एजंट असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याआधीही केला होता.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मुंबई, 25 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोणाच्या जिंकण्यावरून आणि कोणाच्या हारण्यावरून आता पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपच्या बऱ्याच खासदारांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. दाऊदचा माणूस मोदींच्या कॅबिनेट मध्ये कसा होता ? असा सवालही नवाब मलिक यांनी विचारला आहे. याआधीही त्यांनी भाजपचे लोक दाऊच्या संबंधात असल्याची टीका केली होता. आता पुन्हा त्यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित लोक भाजपमध्ये आहेत, तसेच भाजपच्या आयटी सेलमध्ये 'सीआयए'चे एजंट असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याआधीही केला होता. गोंडयाचे खासदार बीजभूषण शरणसिंग हे जेजे हत्याकांडातील आरोपी असल्याचीही माहिती मलिक यांनी त्यावेळी म्हटलं होतं. यावरून चांगलंच राजकारण तापलेलं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यामुळे यावर आता भाजपमधून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

नवाब मलिक यांच्या प्रतिक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे

- राज्यात 115 जागा आघाडी ला मिळाल्या

- आम्हाला विरोधक नाही , अशी हवा करण्यात आली

- या बातम्या प्रसारित करण्यासाठी मीडियाचा वापर करण्यात आला

- याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत चर्चा आम्ही करतोय

- भाजपचे बरेच खासदार दाऊदशी संबंधित

- राज्यातले सर्व गुंड भाजपात घेतले

- गुंड, पोलीस, आणि निवडणूक आयोग याना हाताशी धरून भाजपनं निवडणूक लढली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी निवडणुकांच्या आधी भाजप सरकारवर खोचक टीका केली होती. गृहमंत्री अमित शहा खोटं बोलतात. काश्मीरमध्ये भारताचा झेंडा फडकतोय असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय आणि शिवसेना भवनावर भारताचा तिरंगा कधी फडकला ते देखील अमित शहा यांनी सांगितले. कलम 370 च्या मागे काश्मीर आणि गुलबर्गाची जागा उद्योगपतींना देण्याचा सत्ताधारी सरकारचा डाव आहे. भाजपने नागालंडला वेगळा झेंडा का दिला? वेगळा पासपोर्ट का दिला? असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता.

इतर बातम्या - 'देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी काकूंची मोर्चेबांधणी!

महाराष्ट्राचा नवा विरोधी पक्षनेता कोण होणार? बाळासाहेब थोरात म्हणतात...

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 'आम्हाला सत्ता स्थापन करण्याइतक्या जागा मिळवण्यात अपयश आलं आहे. मात्र समाधानकारक जागा नक्कीच मिळाल्या आहेत,' असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेना सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील कोणता नेता विधानसभेचा विरोधी पक्षनेता होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यावं, याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा होईल. त्यानंतर याचा निर्णय घेण्यात येईल.'

थोरात यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

- मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत समस्या आहे .त्याचा परिणाम दिसून आला.

- स्थानिक पातळीवरून संघटन अधिक मजबूत करायला पाहिजे.

- शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला नाही

- शिवसेनेनं भाजपच्या प्रभावतून बाहेर यायला हवं. त्यानंतर आम्ही दिल्लीशी बोलू

- मनसे आणि वंचित सोबत नव्हते, पण त्यांचा नेमका किती परिणाम हे पाहिलेलं नाही.

- काश्मीर आणि कलम 370 हे राज्यात यशस्वी ठरले नाही

- महाराष्ट्रात काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारात आले होते

- आमच्या नेत्यांनी दोनशेहून अधिक सभा वेगवेगळ्या नेत्यांच्या झाल्या आहे

इतर बातम्या - महाराष्ट्राच्या राजकारणातील नवं पर्व, रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंना फोन आणि...

दरम्यान, महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमतासाठीच्या जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता भाजप - शिवसेनेच्या वाटाघाटींमध्ये नेमकं काय ठरतंय याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. सत्तास्थापनेसाठीच्या वाटाघाटींमध्ये भाजप - शिवसेनेत कायकाय राजकीय नाट्य घडतं हेही पाहावं लागेल. उद्धव ठाकरे त्यांच्या 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनीही 15 बंडखोर आपल्या संपर्कात असल्याचं भाष्य केलं आहे. आकड्यांच्या या खेळात सत्तास्थापनेच्या 3 शक्यता आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 25, 2019, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading