पोलीस ठाण्यासमोर भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, नेत्यांकडून बंदचं आवाहन

पोलीस ठाण्यासमोर भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, नेत्यांकडून बंदचं आवाहन

या घटनेचा निषेध करण्यासाठी पश्चिम बंगाल भाजपने बॅरेकपूरमध्ये 12 तासांचा बंद पुकारला आहे.

  • Share this:

कोलकाता, 05 ऑक्टोबर : पोलीस ठाण्यासमोर अज्ञातांनी भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेता मनीष शुल्का यांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. तर पोलिसांची अधिक कुमक देखील तैनात कऱण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे वेगानं वाहू लागले आहेत. याच निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजप नेत्याची हत्या झाल्यानं परिसरात मोठी खऴबळ उडाली आहे.

पश्चिम बंगालमधील 24 परगना जिल्हातील टीटागढ पोलीस ठाण्यासमोरच हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत शुल्का यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर अज्ञातांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मनीष शुल्का यांच्या हत्येनंतर भाजप नेत्यांनी बॅरेकपूरमध्ये बंदचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

हे वाचा-गृह कर्जाचे EMI भरून झाल्यानंतर आधी करा 'हे' काम, नाहीतर हातातून जाईल घर!

मिळालेल्या माहितीनुसार मनीष शुल्का रात्री 8 च्या सुमारास पोलीस ठाण्यासमोरील भाजप पक्ष कार्यालयात बसले होते. त्याच वेळी दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीष यांना प्रथम बॅरेकपूर येथील बीएन बोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथली गंभीर अवस्था पाहून त्याला अपोलो रुग्णालयात पाठवण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी पश्चिम बंगाल भाजपने बॅरेकपूरमध्ये 12 तासांचा बंद पुकारला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 5, 2020, 8:49 AM IST

ताज्या बातम्या