• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • कपिल पाटलांच्या जन आशीर्वाद यात्रेत चोरांची जत्रा, पीएचे 1 लाख, तर आमदारांचे मोबाईल गायब!

कपिल पाटलांच्या जन आशीर्वाद यात्रेत चोरांची जत्रा, पीएचे 1 लाख, तर आमदारांचे मोबाईल गायब!

एका पत्रकारालाही खिसेकापूंचा झटका बसला आहे. मुलीच्या शिकवणीसाठीचे शुल्क भरण्यासाठी असलेले 15 हजार रूपये पाकिटमारांनी लंपास केले.

एका पत्रकारालाही खिसेकापूंचा झटका बसला आहे. मुलीच्या शिकवणीसाठीचे शुल्क भरण्यासाठी असलेले 15 हजार रूपये पाकिटमारांनी लंपास केले.

एका पत्रकारालाही खिसेकापूंचा झटका बसला आहे. मुलीच्या शिकवणीसाठीचे शुल्क भरण्यासाठी असलेले 15 हजार रूपये पाकिटमारांनी लंपास केले.

  • Share this:
ठाणे, 17 ऑगस्ट : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर (cabinet expansion 2021) ज्या ज्या नेत्यांना मंत्रिपदं दिली आहे अशा सर्व मंत्र्यांची मोठा गाजावाजा करत जन आशीर्वाद यात्रा (bjp bjp jan ashirwad yatra) भाजपकडून काढण्यात येत आहे. पण, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील (kapil patil ) यांची जनआशीर्वाद यात्रा भाजपालाच चांगली महागात पडली आहे. कारण, या यात्रेत चोरट्यांनी हातचलाखी करत अनेक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार एवढंच नाही तर चक्क  राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पी.ए. राम माळी यांचा ही खिशा साफ केला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून राम माळी यांच्याकडे कामाला असणारे शिवाजी गायकवाड यांनी कोपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून शिवाजी गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारारीनुसार “मुंबई नाशिक वाहिनीवर जुना जकात नाका कोपरी ठाणे पूर्व येथे भारतीय जनता पार्टीचे आयोजीत जनआशिर्वाद यात्रेचे दरम्यान राम जगन्नाथ माळी यांच्या पॅन्टीच्या खिशातून तब्बल १ लाख रूपये इतकी रक्‍कम चोरांनी साफ केली. फिर्यादी यांची राम जगन्नथ माळी यांच्यातर्फे अज्ञात इसमाचे विरोधात  तक्रार दाखल केली आहे.  यामुळे भाजपा जनआशिर्वाद यात्रेत भाजपाला चोरट्यांनी चांगलेच लुटले असल्याचे बोलले जात आहे. पुण्यात तब्बल 5 हजार अफगान विद्यार्थी, आदित्य ठाकरेंसमोर मांडली व्यथा! तर भाजपा पदाधिकाऱ्यांनीच दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे एक आमदार यांच्या खिशातील रोकड चोरट्यांनी चोरली असून अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल ही चोरांनी लंपास केल्याची माहिती भाजपा पदाधिकाऱ्यानेच दिली आहे. मात्र या संबंधी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.  सोमवारी दिवसभर मोठ्या धुमधडाक्यात कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा चांगलीच गाजली असताना दुसरीकडे याच कार्यक्रमात भाजपचे नेत्यांसह कार्यकर्त्यांचे खिसे कापले गेल्याची घटना घडली घडल्याने भाजपा नेते कमालीचे संतापले आहे. Raksha Bandhan2021:रक्षाबंधनला देता येईल खास गिफ्ट,जबरदस्त फीचर्ससह बजेट 5Gफोन या यात्रेच्या कार्यक्रमासाठी झालेल्या गर्दीचा फायदा उठवत यावेळी खिसेकापूंनी अनेकांचे खिसे कापले तसंच मोबाईलही लंपास केले. यातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबरच नेते मंडळीही सुटली नसल्याचे समोर आले आहे. एका पत्रकारालाही खिसेकापूंचा झटका बसला आहे. मुलीच्या शिकवणीसाठीचे शुल्क भरण्यासाठी असलेले 15 हजार रूपये पाकिटमारांनी लंपास केले. या कार्यक्रमात चोरट्यांनी आपला हिसका दाखवला असला तरी फारशी तक्रार कोणी नोंदवली नाही. मात्र एका पत्रकाराने पोलीसांकडे तक्रार नोंदवली असल्यामुळे हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
Published by:sachin Salve
First published: