राज्यात पुन्हा निवडणुकीसाठी तयार राहा, भाजपच्या नेत्याचा कार्यकर्त्यांना आदेश

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिले असले तरी भाजप-सेनेमध्ये सत्तेचा तिढा सुटता सुटत नाही आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 11:10 PM IST

राज्यात पुन्हा निवडणुकीसाठी तयार राहा, भाजपच्या नेत्याचा कार्यकर्त्यांना आदेश

दीपक बोरसे,(प्रतिनिधी)

धुळे,3 नोव्हेंबर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिले असले तरी भाजप-सेनेमध्ये सत्तेचा तिढा सुटता सुटत नाही आहे. एका बाजुने सेना आणि आघाडीचे नेते भूमिका मांडत असताना भाजपने मात्र 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र भाजपने आक्रमक भूमिका घेत 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. भाजपचे नेते आणि पर्यटन विकास त्री जयकुमार रावळ यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीची भाषा करत शिवसेनेच्या नकारघंटेला उत्तर दिले आहे. जयकुमार रावळ यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहे. शिवसेनेच्या ताठर भूमिकेला भाजपचे उत्तर देताना या निवडणुकीत थोड्या फरकाने हरलेल्या सर्व जागा जिंकणार असल्याचे रावळ यांनी वक्तव्य केले आहे.

जयकुमार रावळ यांनी सांगितले की, धुळे जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदार संघ आहेत. पाच पैकी चार जागांवर भाजपने निवडणूक लढवली. साक्रीमध्ये 5000 मते कमी पडल्यामुळे भाजपचे बंडोखोर उमेदवार निवडून आला. तर धुळे ग्रामीणमध्ये 8000 मते कमी पडल्यामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. जिल्ह्यातील पाचही जागा भाजपने लढायला हव्यात, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्या संदर्भात आमची तयारी असल्याचे जयकुमार रावळ यांनी म्हटले आहे.

सत्ता स्थापनेच्या खेळात फडणवीस पडलेत एकटे, दिल्लीकरांचे दुर्लक्ष!

मी पुन्हा येईन असा नारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढे करत भाजपने विधानसभा निवडणुक लढवली. 2014 च्या तुलनेत भाजपला कमी जागा मिळाल्या. सेनेसोबत निवडणुकीआधी युती केली. महायुतीला बहुमत मिळालं पण आता दोन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री कोण यावरून सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेनेनं 50-50 फॉर्म्युल्यावरच सरकार स्थापन करायचं अशी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी असं काही ठरलं नव्हतं म्हटलं होतं. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली असेल तर त्यावेळी मी उपस्थित नव्हतो असंही सांगितलं होतं.

Loading...

पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि तो शिवतिर्थावर शपथ घेईल असं पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. 'सत्तेचं गणित जमलं की आम्ही माध्यमांसमोर मांडणार आहोत. पण आता अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे आले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही.' असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

गिरीश महाजन यांना संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला आमच्या पक्षाने बोलण्याचा अधिकार दिलेला नाही. सध्या आमची वेट अँड वॉच अशी भूमिका आहे. सेनेचे नेते बोलत आहेत. त्यांना तो अधिकार आहे. त्यांनी बोलावं आमची कोणतीही तक्रार नाही असंही महाजन यांनी म्हटलं. आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एकदाच त्यांची भूमिका मांडली आहे. त्यानंतर कोणत्याच प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. त्यामुळे सत्ता संघर्षाचा हा पेच कधी सुटणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

राज्यातील सत्तेच्या हा संघर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपण विरोधी पक्षात राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेला भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. तरीही शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम असल्याने भाजपसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच भाजपच्या हायकमांडकडून मात्र हालचाली होत असल्याचं दिसून येत नाही. यावर संजय राऊत यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना वक्तव्य केलं होतं.

सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे दिल्लीतलं नेतृत्व पुढाकार घेत नाही. त्यांनी ही जबाबदारी राज्यातील नेत्यांकडे सोपवली मात्र इथल्या नेत्यांना ती पेलत नसल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. खरंतर आतापर्यंत रावसाहेब दानवे, दिवाकर रावते, चंद्रकांत पाटील यांनी युतीचंच सरकार येईल असं म्हटलं. पण त्यानंतर सेनेकडून इतक्यावेळा भूमिका जाहिर केल्यानंतरही कोणतंच वक्तव्य भाजप नेत्यांकडून आलेलं नाही. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याकडून अनेक नेत्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. आघाडीमध्ये काही नेत्यांनी सेनेला पाठिंबा द्यावा असाही सूर लावला आहे.

महाराष्ट्राबरोबरच हरियाणातही विधानसभा निवडणुका झाल्या. तिथेही सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. तिथे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हरयाणातील प्रादेशिक पक्ष जननायक जनता पार्टीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेतला. हरयाणात सध्या भाजपचा मुख्यमंत्री तर जेजेपीचा उपमुख्यमंत्री आहे. याची घोषणा खुद्द भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी सभा घेतल्या. पण निकालानंतर मात्र असं सत्ता स्थापनेसाठी दिल्लीतून हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे दुर्लक्ष होत असून राज्यात फडणवीस एकटे पडल्याचं दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 10:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...