खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये पक्षांतराची जय्यत तयारी, शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची झुंबड

खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये पक्षांतराची जय्यत तयारी, शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची झुंबड

जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा खडसे यांच्या निवासस्थानाकडे वळवला आहे.

  • Share this:

जळगाव, 20 ऑक्टोबर : भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आता जवळपास निश्चित झाला आहे. कारण मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी सुरू केली असून त्यावरून कमळाचे फूल गायब झालं आहे. तसंच 'नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण' असं म्हणत खडसेंच्या नव्या राजकीय वाटचालीला शुभेच्छाही दिल्या आहेत.

एकीकडे, खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी प्रवेशासाठी मुंबईत दाखल होण्याची तयारी सुरू केली असतानाच दुसरीकडे जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा खडसे यांच्या निवासस्थानाकडे वळवला आहे. खडसे यांच्या घरी येत राष्ट्रवादीची कार्यकर्ते त्यांना पक्षप्रवेशासाठी शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, मुंबईवरून काही निरोप आल्यास एकनाथ खडसे संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

रोहिणी खडसे यांच्या विश्वासू कार्यकर्त्याने काय दिली माहिती?

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि त्याची तारीख याबद्दल खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या विश्वासू कार्यकर्त्याने माहिती दिली आहे. 'एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. समर्थकांना सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे,' असं या कार्यकर्त्याकडून सांगण्यात आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 20, 2020, 5:54 PM IST

ताज्या बातम्या