Home /News /news /

एकनाथ खडसे म्हणाले, राष्ट्रवादीत प्रवेश करणार ही केवळ चर्चाच, पक्षांतराचा विचार नाही!

एकनाथ खडसे म्हणाले, राष्ट्रवादीत प्रवेश करणार ही केवळ चर्चाच, पक्षांतराचा विचार नाही!

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली

भुसावळ, 23 सप्टेंबर: उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण ही फक्त चर्चाच असल्याचं सांगून एकनाथ खडसे यांनी या मुद्याला पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी आपली कसलीही चर्चा झालेली नाही. तसेच माझा पण आता तरी पक्षांतराचा विचार नाही. मात्र, मी राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे, या विषयाची मला स्वतः माहिती नाही. ज्या कोणी हा विषय काढला असेल त्याच्याकडे याची माहिती असेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. हेही वाचा...BREAKING: 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद! मराठा गोलमेज परिषदेत मोठी घोषणा दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आनंद होईल. त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी खडसे यांनी शिवसेनेत यावं असं म्हटलं. ही विधानं विविध पक्षाच्या नेत्यांनी केली. राष्ट्रवादीत पक्षांतर करण्याबाबत असं काही घडलेलं नाही. मी अजूनतरी पक्षांतर करण्याचा माझा विचार पक्का केलेला नाही, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भरती सुरूच आहे. यानंतर आता भाजपचे अनेक नेते हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सत्ता गमावल्यानंतर आता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाच्या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव या चर्चेत आघाडीवर आहे. मुंबईतील आजच्या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे मोजके नेते उपस्थित असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे. मात्र, याबाबत एकनाथ खडसे यांनी स्वत: प्रतिक्रिया देऊन या विषयाला पूर्ण विराम दिला आहे. उत्तर महाराष्ट्रामधील भाजप नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे याच भागातून पक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे. यासंबंधी एनसीपी कार्यालयात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यासह उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी आमदारांची बैठक सुरू आहे. इतर पक्षातील विशेषत भाजपातील काही नेते यांना राष्ट्रवादी पक्षप्रवेश द्यायचा का याबाबत खलबत सुरू असल्याची चर्चा आहे. सध्या अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या वेट अँड वॉच भूमिकेमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. जोपर्यंत भाजत नेते पक्षात प्रवेशाची अधिकृत घोषणा करत नाहीत तोपर्यंत इतर पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच परभणीचे माजी अपक्ष आमदार आणि अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट आणि त्यांचे नातू भरत घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला होता. घनदाट हे परभणीतून अपक्ष आमदार म्हणून निवडले गेले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी घनदाट यांनी विधिमंडळात शिपाई म्हणून 17 वर्षे काम केलं होतं आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणून 3 वर्षे काम केलं होतं. हेही वाचा...मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण नको, काँग्रेस मंत्र्याची भूमिका काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता. यावेळी प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि स्वानंदी देखील उपस्थित होते. तर यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नियुक्त्या देखील करण्यात आल्या.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP, Eknath khadse, NCP

पुढील बातम्या