मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल, चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांवर पलटवार

मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल, चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांवर पलटवार

दुसरीकडे, पुण्यातल्या कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुण्यातले जंबो हॉस्पिटल पूर्ण निधी देऊन उभारून देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष आणि पुणे शहरातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

दुसरीकडे, पुण्यातल्या कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुण्यातले जंबो हॉस्पिटल पूर्ण निधी देऊन उभारून देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष आणि पुणे शहरातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मी त्यांना अनेकदा आव्हान दिलंय की त्यांनी एकट्यानं लढावं, पण ते घाबरतात

  • Published by:  Sandip Parolekar

पुणे, 4 डिसेंबर: महाविकास आघाडीचा अजेंडा एक नाही आणि झेंडाही एक नाही आहे. एकमात्र अजेंडा आहे की भाजपला निवडणुकीत वेगळं ठेवणं आहे. एव्हढी भीती त्यांच्या मनात भाजपबद्दल आहे. ते एकत्र आले त्यामुळे आलेले निकाल अनपेक्षित नाहीत. मी त्यांना अनेकदा आव्हान दिलंय की त्यांनी एकट्यानं लढावं, पण ते घाबरतात. ते एकत्र लढतात. तरी देखील आम्ही या पराभवाचं चिंतन करु, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी दिली आहे.

मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. सहसा शरद पवार खालच्या लेव्हलची स्टेटमेंट्स करत नाहीत. पण ते असं का करत आहेत, ते माहिती नाही, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा...महाराष्ट्र बदलत आहे! महाविकास आघाडीला जनतेनं स्वीकारलं, शरद पवारांची प्रतिक्रिया

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकाल समोर आले आहेत. निकालास आश्चर्यकारक असं काहीही नाही. तिघे एकत्र येऊन लढले. त्यामुळे असं चित्र समोर आलं. तरी देखील भाजपनं निकरानं लढा दिला. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकट्यानं लढावं. पण त्यांच्यात ती हिंमत नाही, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, या निवडणुकीच्या निकालांना महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कारभाराचा कौल म्हणता येणार नाही. प्रत्येक पक्षाची एक व्होट बॅंक असते. यामुळे राज्यातील सरकारवर लोकं खूश आहेत, असं म्हणता येणार नाही. मित्राचा मित्र राहायचं नसेल तर मग दु:ख करण्यात काही अर्थ नाही, असंही पाटील यांनी सांगितलं.

शिवसेनेनं भोपळा मिळवला...

चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर सडकून टीका केली. शिवसेनेने या निवडणुकीत भोपळा मिळवला. अमरावतीत अनिल देशमुखांचे मेव्हणे जिंकून आले आहे. शिवसेनेचा उमेदवार पडला. शिवसेनेचं काही कळत नाही पण असं म्हटलं की संजय राऊत माझ्यावर अग्रलेख लिहितील, असा टोला लगावला.  आम्हाला आमची एकट्याची ताकद वाढवावी लागेल. मित्र सोबत असताना काही ना काही बळ मिळत असतं.

दरम्यान, हैदराबाद नगरपालिका निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले की, माझा राष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास नाही आहे. सुरुवातीचे कल पाहून स्वभाविक आनंद वाटला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे संपूर्ण देशभर प्रवास करणार आहेत. तसं ते महाराष्ट्रात येणार आहे. कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाही, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते शरद पवार?

विनोदी विधाने करणं हा चंद्रकांत पाटलांचा लौकिक आहे, असा खोचक टोला देखील शरद पवारांनी लगावला. ते म्हणाले, मागच्या वेळी विधान परिषदेला कसे निवडून आले हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी विधानसभेला पुण्यातील सुरक्षित मतदार संघ निवडला, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. चंद्रकांत पाटलांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता. त्यामुळे ते जे बोलतात त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका पवार यांनी केली.

हेही वाचा...RBI चा रेपो रेट कमी न करण्याचा निर्णय, व्याजदराचा सामान्यांवर काय होतो परिणाम?

चंद्रकांत पाटील यांची इच्छा पूर्ण होणार नाही...

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत यांनी हा पराभव मोठ्या मनाने स्वीकारायला हवा. आम्ही वेगवेगळे लढावं ही त्यांची इच्छा सध्या तरी पूर्ण होणार नाही. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. हा विजय राष्ट्रवादीच्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे. या विजयाचं श्रेय हे कार्यकर्त्यांनाच आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. पराभव झाला असता तर ती माझी जबाबदारी असतं, असंही ते यावेळी म्हणाले. मी माझ्या पक्ष वाढवण्याच्या कामात आनंदी आहे. आताशी सरकारला एक वर्ष होतं आहे. सगळे मंत्री उत्तम काम करत आहेत. त्यांच्याच चांगल्याप्रकारे समन्वय आहे, असंही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Chandrakant patil, Maharashtra, Sharad pawar