भाजपचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित- संजय राऊत

भाजपचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित- संजय राऊत

जम्मू-काश्मीरमधील पीडीपी सरकारचा भाजपने पाठिंबा काढल्याचे जाहीर करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. परंतु, भाजपचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जून : जम्मू-काश्मीरमधील पीडीपी सरकारचा भाजपने पाठिंबा काढल्याचे जाहीर करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. परंतु, भाजपचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, काश्मीरमध्ये ही युती झाली, तेव्हा ती अभद्र युती असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. ती टिकणार नाही असं उद्धव ठाकरे म्हटल्याचंही राऊत म्हणाले.

काश्मीरमध्ये हे सरकार आल्यानंतर हिंसाचार वाढला असल्याचं राऊत म्हणाले. 2019ची निवडणूक लक्षात घेता भाजपनं पाठिंबा काढून घेतलाय आणि हे राजकारणानं प्रेरित असल्याची टीका त्यांनी केली.

जम्मू आणि काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून परिस्थिती नियंत्रणात राखण्यास राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप राम माधव यांनी केला. अशा परिस्थितीत सरकारमध्ये राहणं भाजपला शक्य नाही. त्यामुळे देशहिताचा विचार करता भाजपने हा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले.

जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या एकून 87 जागा असून त्यात पीडीपीला 26, भाजपला 25, नॅशनल कॉन्फरन्सला 15 तर काँग्रेसला 12 जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा

भाजप जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर, मेहबुबा मुफ्ती देणार राजीनामा!

जम्मू आणि काश्मीरमध्ये काय आहेत पर्याय?

First published: June 19, 2018, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading