ऐन गणेशोत्सवात सिद्धिविनायक मंदिराला छावणीचं स्वरुप, आज राज्यभर भाजपचं आंदोलन

ऐन गणेशोत्सवात सिद्धिविनायक मंदिराला छावणीचं स्वरुप, आज राज्यभर भाजपचं आंदोलन

मंदिरं उघडावीत या मागणीसाठी भाजप आज राज्यभरात घंटानाद आंदोलन करणार आहे. पुण्यात आज दोन ठिकाणी हे घंटानाद आंदोलन होतं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असला तरी कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. अशात आता राज्य अनलॉक होण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे भाजपकडून मंदिरं उघडण्यासाठी जोर धरला जात आहे. मंदिरं उघडावीत या मागणीसाठी भाजप आज राज्यभरात घंटानाद आंदोलन करणार आहे. पुण्यात आज दोन ठिकाणी हे घंटानाद आंदोलन होतं आहे. सारसबाग आणि ओंकारेश्वर मंदिराबाहेर भाजप कार्यकर्ते एकञ जमणार आहेत. सकाळी 10 वाजता सारसबाग तर 11 वाजता ओंकारेश्वर मंदिरात घंटानाद होणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबईतही भाजप आंदोनलन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर सिद्धीविनायक मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्तं तैनात करण्यात आला आहे. भाजपच्या घंटानाद आंदोनामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. भाजपचे कार्यकर्ते सिद्धीविनायक मंदिराबाहेर निदर्शने करणार आहेत. त्यामुळे सिद्धीविनायक मंदिरा बाहेर पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे.

दरम्यान, ज्यात धार्मिक स्थळं मंदिरं आणि जीम सुरू करण्याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संकेत दिले आहेत. राज्यातील मंदिरे आणि जीम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे, असंही संजय राऊत यांनी गुरूवारी स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधींना नेतृत्व देण्याबाबत काँग्रेस नेत्यांनी लिहिलं पत्र, केली मोठी मागण

खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, राज्यातील धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भाष्य केलं आहे. माझ्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असं राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर राज्यातील जनजीवन सामान्य होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हिवाळ्यात कोरोनाचा मृत्यूदर हाताबाहेर जाईल, WHO ने दिला धक्कादायक इशारा

देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला...

दुसरीकडे, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला. विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतलं जाईल, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

तसेच देशातला प्रमूख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आहे. आता जमिनीवरचे काम त्यांनी सुरू करायला हवं, पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत, असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 29, 2020, 9:35 AM IST

ताज्या बातम्या