मुख्यमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक, राजू शेट्टींना घेऊन आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत

मुख्यमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक, राजू शेट्टींना घेऊन आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत

राजू शेट्टी यांनी भाजपमध्ये यावं असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असल्याचं या बैठकीतून समोर आलं. पण यावर राजू शेट्टी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

  • Share this:

मुंबई, 13 मार्च : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. काँग्रेस आघाडीनं प्रतिसाद न देल्यामुळे राजू शेट्टी नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी भाजमध्ये घेण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

यासंबंधी भाजप पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टींची भेट देखील घेतली. मंगळवारी भाजपच्या काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. तब्बल 2 तास त्यांच्यामध्ये बैठक झाली. राजू शेट्टी यांनी भाजपमध्ये यावं असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असल्याचं या बैठकीतून समोर आलं. पण यावर राजू शेट्टी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, राजू शेट्टींसाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत. त्यांचं आमच्या पक्षात स्वागत आहे असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून राजू शेट्टींना पक्षात घेण्याची चाचपणी सुरू आहे. यावर आता राजू शेट्टी काय निर्णय घेतात यावर सर्व राजकीय समीकरणं अवलंबून आहेत.

तर राजू शेट्टी यांनी भाजपच्या गोटात घेण्याची मुख्यमंत्र्यांची ही मास्टर खेळी असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण, सुजय विखेंनी देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तर रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे.

शेट्टींनी आघाडीत यावं - अशोक चव्हाण

खासदार राजू शेट्टी यांनी 3 जागांची काँग्रेस राष्ट्रवादीकडे मागणी केली. पण त्यांना एकूण दोन जागा देण्याचं काँग्रेसनं मान्य केलं. राजू शेट्टी आणि काँग्रेसची याबाबतीत चर्चा झाली. पण जागा वाटपाचं हे सूत्र राजू शेट्टींनी मान्य नाही. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाआघाडीत यावं यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

संबंधित बातम्या : भाजपला मोठा धक्का, माढ्यातून 'या' मंत्र्यांने घेतली माघार

राज्यात चौथी आघाडी; भाजपला बसणार धक्का?

NDAचे मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष आता भाजपची साथ सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात चौथ्या आघाडीची निर्मिती होऊन भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि रासपचे अध्यक्ष तथा दुग्धविकासमंत्री महादेव जानकर आणि प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपेकर यांची पुणे येथे बैठक झाली.

यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत जवळपास 1 तास चर्चादेखील करण्यात आली. या साऱ्या घडामोडी पाहता राज्यात चौथ्या आघाडीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही मित्र पक्ष भाजप - शिवसेनेपासून लांब गेल्याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो.

आघाडीला आणखी एक ऑफर आणि इशाराही

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपविरोधात आता सर्वपक्षीय विरोधक एकवटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता माकपनेही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण, त्यासाठी आघाडीने त्यांना एक जागा सोडावी, अशी मागणी माकपने केली आहे.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वात राज्यात महाआघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु त्यास अजूनही यश येताना दिसत नाही. कारण प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीही जागावाटपाबाबत संतुष्ट नसल्याचंच चित्र आहे.

VIDEO : शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर पार्थ म्हणाले...

First published: March 13, 2019, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading