गुजरातमध्ये प्रचारासाठी भाजपने उतरवली चक्क 'जादूगारांची फौज' !

गुजरातमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने आता चक्क जादूगारांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरवलीय. विशेषतः ग्रामीण भागात हे जादूगर भाजपसाठी प्रचार करणार आहेत. त्यासाठी गुजरातच्या प्रदेश भाजपने तब्बल 36 जादूगरांनी प्रचारासाठी नेमलंय. हे सर्व जादूगर जादूंच्या प्रयोगासोबतच भाजपने कसा गुजरातचा विकास केलाय, याचंही महत्व ग्रामीण जनतेला पटवून देणार आहेत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 21, 2017 10:22 PM IST

गुजरातमध्ये प्रचारासाठी भाजपने उतरवली चक्क 'जादूगारांची फौज' !

21 नोव्हेंबर, गांधीनगर : गुजरातमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने आता चक्क जादूगारांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरवलीय. विशेषतः ग्रामीण भागात हे जादूगर भाजपसाठी प्रचार करणार आहेत. त्यासाठी गुजरातच्या प्रदेश भाजपने तब्बल 36 जादूगरांनी प्रचारासाठी नेमलंय. हे सर्व जादूगर जादूंच्या प्रयोगासोबतच भाजपने कसा गुजरातचा विकास केलाय, याचंही महत्व ग्रामीण जनतेला पटवून देणार आहेत. विशेष म्हणजे यातले काही जादूगर हे महाराष्ट्रातून बोलावल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

नोटबंदी आणि जीएसटीमुळे ग्रामीण भागात भाजपला गेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. म्हणूनच यावेळी ग्रामीण जनतेला पुन्हा आपलंस करण्यासाठी चक्क जादूगारांची मदत घेतलीय. दरम्यान, भाजपच्या या जादूगरी प्रचार फंड्याची जोरदार खिल्ली उडवलीय. भाजप इतके दिवस जुमला पार्टीच होतीच पण तीच पार्टी आता जादूगर पार्टीही बनून गेलीय. अशा शब्दात काँग्रेसने भाजपवर टीकास्त्रं सोडलंय.

भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी सोशल मीडियाचा मोठा प्रभावशाली वापर केला होता. पण त्याच सोशल मीडियाने गुजरातमध्ये भाजपच्या विकासाला वेडा ठरवल्याने भाजपला चक्क जादूगारांची मदत घ्यावी लागतेय. यावरून गुजरातमध्ये भाजपची किती बिकट अवस्था झालीय, हेच स्पष्ट होतंय. असंही काँग्रेसने म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 10:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...