चार वर्षात लोकसभेच्या 27 पैकी फक्त 5 पोटनिवडणूका भाजपनं जिंकल्या

चार वर्षात लोकसभेच्या 27 पैकी फक्त 5 पोटनिवडणूका भाजपनं जिंकल्या

  • Share this:

नवी दिल्ली,ता.31 मे: गेल्या चार वर्षात भाजपने देशातली अनेक राज्य जिंकून आपलं वर्चस्व निर्माण केलं. पण पोटनिवडणूकांमध्ये मात्र भाजपला सतत पराभव पत्करावा लागला. विरोधी पक्ष हे फक्त पोटनिवडणूकीत जिंकणारे पक्ष आहेत अशी टीका भाजपनं केली मात्र विरोधकांची एकजूट होत असल्यानं 2019 च्या दृष्टीने भाजपसाठी चिंतेचा विषय आहे.

गुरूवारी लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या 11 जागांसाठी निकाल लागले. त्यात महाराष्ट्रातली लोकसभेची पालघर आणि उत्तराखंडमधली थराली ही विधानसभेची जाग सोडली तर सर्वच ठिकाणी पराभव स्विकारावा लागला. उत्तर प्रदेशमधल्या कैराना या लोकसभेच्या जागेवर सर्व विरोधीपक्ष एकत्र आल्यानं भाजपचा पराभव झाला.

तर गेल्या चार वर्षात काँग्रेसनेही फक्त 5 जागाच जिंकल्या आहेत. त्यातली अमृतसर वगळता इतर चार जागा काँग्रेसनं भाजपकडून खेचून आणल्या आहेत. त्याखलोखाल तृणमूल काँग्रेसने 4 जागा जिंकल्या.

2014 पासून झालेल्या 27 लोकसभा पोटनिवडणूकीतल्या 13 जागा या आधी भाजपकडे होत्या. भाजपने ज्या पाच जागा मिळवल्या तिथे भाजप कधीच सत्तेत नव्हती. 2014 मध्ये 2 आणि 2016 मध्ये भाजपने दोन जागा मिळवल्या.

2014 पासून झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणूकींवर एक नजर

Loading...

2014

बीड, महाराष्ट्र - भाजपनं जागा कायम राखली

कंधमाल, ओडिशा - बीजू जनता दलाने जागा कायम राखली

मेढक, तेलंगणा - टीआरएसने जागा कायम राखली

बडोदा, गुजरात - भाजपनं जागा कायम राखली

मैनपुरी, उत्तरप्रदेश - समाजवादी पक्षानं जागा कायम राखली

2015

रतलाम, मध्यप्रदेश - काँग्रेसनं भाजपकडून जागा घेतली

वारंगल, तेलंगणा - टीआरएसला जागा राखण्यात यश

बांगावोन, पश्चिम बंगाल - तृणमूलने जागा कायम राखली

2016

लक्ष्मीपूर, आसाम - भाजपने जागा कायम राखली

शहाडोल, मध्यप्रदेश - भाजपने जागा कायम राखली

कुछबिहार, पश्चिम बंगाल - तृणमूलने जागा कायम राखली

तुमलूक, पश्चिम बंगाल - तृणमूलने जागा कायम राखली

तुरा, मेघालय - एनपीपीने जागा कायम राखली

2017

अमृतसर, पंजाब - काँग्रेसने जागा कायम राखली

गुरूदासपूर, पंजाब - काँग्रेसने भाजपकडून जागा पटकावली

श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर - नॅशनल कॉन्फरन्सने पीडीपीकडून जागा मिळवली

मल्लापुरम, केरळ - मुस्लिम लीगने जागा कायम राखली

2018

पालघर, महाराष्ट्र - जागा कायम राखण्यात भाजपला यश

भंडारा-गोंदिया, महाराष्ट्र - राष्ट्रवादीने भाजपकडून जागा घेतली

अलवर, राजस्थान - काँग्रेसने भाजपकडून जागा पटकावली

अजमेर, राजस्थान - काँग्रेसने भाजपकडून जागा पटकावली

उलबेरिया, पश्चिम बंगाल - तृणमूलने जागा कायम राखली

गोरखपूर, उत्तरप्रदेश - समाजवादी पक्षाने भाजपकडून जागा मिळवली

कैराना, उत्तरप्रेदश - राष्ट्रीय लोक दलानं भाजपकडून जागा घेतली

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2018 10:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...