Home /News /news /

पार्थ पवारांच्या भाजप प्रवेशावर गिरीष बापट यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

पार्थ पवारांच्या भाजप प्रवेशावर गिरीष बापट यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

पार्थ टोकाची भूमिका घेत भाजपमध्ये प्रवेश करणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. पण यावर भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

    मुंबई, 16 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार याला सार्वजनिकरित्या फटाकरल्यानंतर पार्थची पक्षावर नाराजी या सगळ्या वादंगात पार्थ पवार मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पार्थ टोकाची भूमिका घेत भाजपमध्ये प्रवेश करणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. पण यावर भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही' असं स्पष्ट सांगून त्यांनी चर्चेला पूर्णविऱ्हाम दिला. पार्थ भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेत नाही असं गिरीष बापट म्हणाले आहेत. हा त्यांचा कौटुंबिक वाद आहे. आपण त्यात फार पडू नये. त्यांनी तो घरातच सोडवावा असं यावेळी बोलताना गिरीष बापट म्हणाले. खरंतर पार्थ पक्षावर आणि शरद पवार यांच्यावर नाराज होते. त्यामुळे ते मोठी भूमिका घेत भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं. पण गिरीष बापट यांनी या चर्चेला पूर्णविऱ्हाम दिला आहे. पुण्यात मानाच्या 5 गणपतींसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेश भक्तांमध्ये आनंद पवार कुटुंबात पुन्हा All Is Well राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार याची पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कानउघडणी केल्यामुळे पवार कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू होता. पण आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नातू पार्थ पवार यांच्यातील वाद निवळला असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून देण्यात आहे. आज बारामतीमध्ये संपूर्ण पवार कुटुंबाची बैठक पार पडली. याबैठकीमध्ये आजोबा-नातवाच्या वादंगावर अखेर पडदा पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे. Breaking: भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची फोनवरून चर्चा झाली आहे. वाद निवळल्याने शरद पवार पुण्यातून मुंबईत दाखल झाले आहेत. तर बैठक आवरून बारामतीहून अजिप पवार हे पुण्याला रवाना झाले असून ते त्यानंतर मुंबईत येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या