...तर शिक्षणमंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असं म्हणायची वेळ येऊ देऊ नका

...तर शिक्षणमंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असं म्हणायची वेळ येऊ देऊ नका

लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांचा पगाराचा आणि कामाचं मूल्यमापन करावे, अशी मागणी

  • Share this:

चिपळूण, 30 ऑक्टोबर: गुहागरचे माजी आमदार आणि उत्तर रत्नागिरी जिल्हाचे भाजपचे अध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी शिक्षणमंत्र्यांचे डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल करत राज्याच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांचा पगाराचा आणि कामाचं मूल्यमापन करावे, अशी मागणी डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा..‘पवारांकडे हर मर्ज की दवा’, राज यांच्यावर निशाणा; शिवसेनेनं केलं पवारांचं कौतुक

राज्यात एकीकडे अनलॉकची प्रक्रिया वेगाने सुरू असताना शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकावर माजी आमदार विनय नातू यांनी आक्षेप घेतला आहे. शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी जारी केलेले पत्र आणि शासनाचा अनलॉक प्रक्रियेचा निर्णयाशी विसंगत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे.

कोविडच्या काळात आता अनेक शासकीय कार्यालय 100 टक्के सुरू असताना शिक्षण विभाग कोल्हापूरने मात्र शिक्षण संस्थांना पत्र देत शिक्षकांना शाळेत बोलावू नये, असं म्हटलं आहे. यानंतर डॉ विनय नातू यांनी त्या पत्रावर आक्षेप घेणारे एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

डॉ. विनय नातू पत्रात म्हणतात की, सर्वात जास्त पगारावरील खर्च असलेल्या शिक्षण विभागाचा कोविडच्या काळात वापर करायाचा सोडून शासन संघटनांच्या पत्राप्रमाणे निर्णय जारी करत आहे, असा आरोप डॉ. विनय नातू यांनी केला आहे. कोरोना काळात शिक्षकांना दिलेला पगार आणि त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्याची मागणी देखील केली आहे.

डॉ. नातू यांनी शिक्षण विभागाच्या धोरणांविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. 2020 हे वर्ष संपत आलं, मात्र तरीही शिक्षण विभागाचे शिक्षणाविषयी धोरण अद्याप ठरत नाही आहे. आर्थिक परिस्थिती नसतानाही ग्रामीण भागातील पालकांनी मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून नवे अँड्रॉइड फोन घेतले आहेत. मुलांचे ऑनलाइन क्लास झालेत. पण अद्याप तिमाई, सहामाही परीक्षांचा पत्ता नाही.

हेही वाचा..उर्मिला मातोंडकरचं नाव आमच्याकडं चर्चेत नाही, शिवसेना नेत्यानं टाकला पडदा

कोविडच्या काळात अल्प मानधन घेणारे आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी जर 100 टक्के उपस्थितीत काम करत असतील तर मुलांची शिक्षणाची सवय मोडू नये. यासाठी शालेय शिक्षकांनी शाळेत उपस्थित का राहू नये, असा सवालही डॉ. नातू यांनी केला आहे. या सगळ्याचा विचार करून शासनाने नवीन पत्रक जारी करावे, अन्यथा शिक्षण मंत्र्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असे म्हणायची वेळ येईल. शिक्षण विभाग नेमके कोणासाठी काम करत आहे ? पालकांकरता ? विद्यार्थ्यांकरीता? की फक्त शिक्षकांकरीता असा प्रश्न देखील डॉ. विनय नातू यांनी केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 30, 2020, 5:51 PM IST
Tags: ratnagiri

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading