Home /News /news /

भाजपच्या माजी महापौराला अटक, खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकावर केला प्राणघातक हल्ला

भाजपच्या माजी महापौराला अटक, खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकावर केला प्राणघातक हल्ला

बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी माजी महापौर तथा भाजप नगरसेवक ललित कोल्हे यांना अटक केली.

जळगाव, 28 मे: खंडणी मागत पिस्तूलाचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी माजी महापौर तथा भाजप नगरसेवक ललित कोल्हे यांना अटक केली. ललित कोल्हे हे घटनेपासून फरार होते. या वादाचं कारण एक महिला असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं होतं. कोल्हेच्या अटकेनं राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. हेही वाचा..भयानक! औरंगाबादेत एकाच दिवशी 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू, रुग्णसंख्या 1362 बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर 16 जानेवारी 2020 रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. CCTV फुटेज मध्येही ही अमानुष मारहाण रेकॉर्ड झाली होती.  यातील मुख्य संशयित असलेले कोल्हे यांना तब्बल चार महिन्यांनंतर अटक करण्यात आली. या गुन्ह्यात आत्तापर्यंत सहा संशयितांना अटक केली आहे. अटकेतील पाच जणांचे अंतरिम जामीन अर्ज 26 मे रोजी कोर्टानं फेटाळले होते. काय आहे प्रकरण? खुबचंद साहित्या यांच्या मुलाच्या नावावर असलेली महागडी चारचाकी त्यांनी माजी महापौर ललित कोल्हे यांना दिली होती. ही चारचाकी परत मागितल्यानंतर कोल्हे यांनी देण्यास टाळाटाळ केली. तसेच साहित्या यांच्याकडून खंडणी मागितली होती. 16 जानेवारी 2020 रोजी रात्री साडे आठ वाजता शहरातील गोरजाबाई जिमखाना येथे साहित्या गेले असता यावेळी ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होती. पिस्तूलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर ललित कोल्हे 3 महिन्यांपासून फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ललित कोल्हेंवर पाळत ठेवली होती. ललित कोल्हे हे रामानंदनगर परिसरात आल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून कोल्हे यांना ताब्यात घेतलं. रात्री 11 वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. ललित कोल्हे यांचे राजकीय वलय आणि त्यांच्यावर या पूर्वीचेही अनेक गुन्हे दाखल आहेत. हेही वाचा.. बोअरवेलमध्ये अडकलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Jalgaon

पुढील बातम्या