मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

VIDEO :हफ्ता दिला नाही म्हणून भाजप नगरसेवकाचा हाॅटेलमध्ये धुडगूस

VIDEO :हफ्ता दिला नाही म्हणून भाजप नगरसेवकाचा हाॅटेलमध्ये धुडगूस

नवी मुंबई, 13 आॅगस्ट :  खारघर येथील सेक्टर ४ इथं नवीन हॉटेल चालविणाऱ्या व्यावसायिकाला पन्नास हजार रूपयांची खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने बेदम मारहाण केली आहे. आपल्या गुंडांना घेवून हाॅटेलमध्ये येत धुमाकूळ घालणाऱ्या नगरसेवक शत्रुघ्न काकडे याचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाणीत जखमी झालेले हाॅटेल मालक ईस्माईल शेख यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे याने अनेक कार्यकर्त्यांसह इस्माईल यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना आणि कामगारांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे, त्याचे नातेवाईक आणि साथीदार यांच्यावर खंडणी मागणे, मारहाण करणे असं गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खारघरमध्ये अशा प्रकारे गावगुंडांचा त्रास व्यावसाईकांना होत असल्याने यांच्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे.

First published:

Tags: नवी मुंबई, भाजप