अपघातात भाजप नगरसेविकेचा मृत्यू, फुटपाथवर उभ्या असताना कारने उडवलं!

अपघातात भाजप नगरसेविकेचा मृत्यू, फुटपाथवर उभ्या असताना कारने उडवलं!

माजी नगरसेविका आणि रायगड जिल्हा महिला भाजप अध्यक्ष कल्पना राऊत याही या अपघातात गंभीर जखमी झाल्यात.

  • Share this:

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

पनवेल, 04 ऑक्टोबर : पनवेल महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा काल रात्री अपघाती मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेविका आणि रायगड जिल्हा महिला भाजप अध्यक्ष कल्पना राऊत याही या अपघातात गंभीर जखमी झाल्यात. काल रात्री या दोघी पनवेल येथील रॉयल गार्डनजवळ फुटपाथवर उभ्या असताना स्विफ्ट गाडीने त्यांना उडवलं. रस्त्याचं काँक्रीटीकरणाच्या कामामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकाचा ताबा सुटला आणि अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या - जितेंद्र आव्हाडांविरोधात शिवसेना मराठमोळ्या अभिनेत्रीला देणार तिकीट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट गाडी ही एक महिला चालवत होती. पोलिसांनी गाडी आणि महिलेला ताब्यात घेतलं आहे असून अधिक तपास सुरू आहे. या अपघातामध्ये जखमी कल्पना राऊत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात कारची धडक इतक्या जोरात होती की मुग्धा यांचा यात जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ

Published by: Renuka Dhaybar
First published: October 4, 2019, 8:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading