भाजप नगरसेविकेची कमाल, परप्रांतीयांसाठी कार्यालयातच बसवले डॉक्टर, फॉर्म केंद्रही सुरू

भाजप नगरसेविकेची कमाल, परप्रांतीयांसाठी कार्यालयातच बसवले डॉक्टर, फॉर्म केंद्रही सुरू

परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठवण्याची सोय करण्याकरता राजकीय पक्षांमध्ये देखील चढाओढ सुरू झाली आहे.

  • Share this:

ठाणे, 03 मे : लॉकडाऊनमुळे राज्यात अडकून पडलेले परप्रांतीय मजूर, कामगार, भाविक आणि विद्यार्थी यांना प्रवास करण्याची केंद्र आणि राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठवण्याची सोय करण्याकरता राजकीय पक्षांमध्ये देखील चढाओढ सुरू झाली आहे.

ठाण्यात  परप्रांतीय मजुरांना मदत करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये कुरघोडी सुरू झाली आहे. ठाण्यातील भाजपा नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी तर चक्क परगावी जाण्याकरता परप्रांतीय मजूर, कामगार, भाविक आणि विद्यार्थी यांना शासनाने नमूद केल्याप्रमाणे भरुन देण्याचे फॉर्म सेंटरच उघडले आहे.

हेही वाचा -हृतिक रोशन कापणार होता हाताचं सहावं बोट, ऑपरेशनची तयारी सुद्धा झाली, पण...

ठाण्यातील घंटाळी मैदान येथील साईबाबा मंदिर शेजारी नगरसेविका प्रभिता मढवी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे या कार्यालयातच त्यांनी परप्रांतीय मजूर, कामगार, भाविक आणि विद्यार्थींना फॉर्म उपलब्ध करुन दिलेत तसंच हा फॉर्म भरुन देखील दिले जात आहे.

एवढंच नाही तर फॉर्म सोबत डॉक्टरचे मेडिकल फिटनेस सर्टीफिकेट देखील दिले जात आहे. या करता डॉक्टर ही याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ठाण्यात परप्रांतीय परप्रांतीय मजूर, कामगार, भाविक आणि विद्यार्थी यांना त्यांच्या गावी पाठवण्याकरता अनेक राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा - Alert! देशात नव्या पद्धतीने होतोय सायबर घोटाळा, वाचण्यासाठी हे लक्षात ठेवा

कारण, परप्रांतीय मजूर, कामगार, भाविक आणि विद्यार्थी यांची मोठी संख्या ठाण्यात आहे. त्यामुळे एक मोठा मतदार वर्ग लक्षात घेता भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात आता या परप्रांतीय मजूर, कामगार, भाविक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी पाठवण्याकरता चढाओढ सुरू झाली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 3, 2020, 2:18 PM IST
Tags: BJPthane

ताज्या बातम्या