युतीच्या वादात नवा ट्वीस्ट, सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी नितीन गडकरी मैदानात

निवडणुका झाल्यानंतर गडकरी आणि मुख्यमंत्री यांच्यातली ही पहिली भेट असणार आहे. भाजपचा मोठा चेहरा म्हणून गडकरी यांना माणलं जातं.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 06:51 PM IST

युतीच्या वादात नवा ट्वीस्ट, सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी नितीन गडकरी मैदानात

मुंबई, 04 नोव्हेंबर : राज्यातल्या सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेली कोंडी फुटण्याची अजुनही शक्यता दिसत नाही आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आता नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा गडकरी सोडवणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

निवडणुका झाल्यानंतर गडकरी आणि मुख्यमंत्री यांच्यातली ही पहिली भेट असणार आहे. भाजपचा मोठा चेहरा म्हणून गडकरी यांना माणलं जातं. शिवसेनेतही गडकरी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत सुरू असलेला युतीचा वाद सोडवण्यासाठी आता गडकरी यांना मैदानात उतरवण्यात येत असल्याच्या राजकीय चर्चा आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिनसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चाच बंद झाली आहे. तर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. ती थांबवण्यासाठी आणि युतीचा तिढा सोडवण्यासाठी आता गडकरी यांना संकटमोचक म्हणून भाजपनं मैदानात उतरवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता गडकरी पुन्हा युतीचा संसार सुरळीत करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, आता भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मागण्यासाठी होती असं सांगितलं जातं. मात्र या भेटीत राज्यातल्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. शिवसेनेने जी भूमिका घेतली त्यावर अमित शहा नाराज असल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलंय. मुख्यमंत्रिपदावर कुठल्याही स्थितीत तडजोड करण्यास भाजपची तयारी नाही. सध्या भाजपची वेट अँड वॉचची स्थिती राहणार असल्याचंही भाजपकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे राज्यातली सत्तास्थापनेची कोंडी सध्याच फुटण्याची शक्यत नाहीये.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप गृहमंत्री पद देण्यासाठी तयार नाही. त्याचबरोबर नगरविकास मंत्रालय देखील देण्यास तयार नाही. त्यामुळे भाजपची वेट अँड वाचची भूमिका. शिवसेनेनेच चर्चेची दारे बंद केली आहेत. जेव्हा शिवसेना प्रतिसाद देईल तेव्हा आम्ही बोलू .शिवसेनेने हमी द्यावी त्यानंतर बोलू. सत्तेमध्ये समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्री पदाचे वाटप नव्हे. चर्चा सुरू झाली तर मागण्याचा विचार करू असं आता भाजपच्या सूत्रांकडून सांगितलं जातंय.

Loading...

अमित शहा आणि उध्दव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री नव्हते  त्यामुळे शिवसेना दावा करते त्याबद्दल  भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना माहित नाही. शिवसेनेचा राष्ट्रवादीवर जास्त विश्वास ठेवत असल्याबद्दलही भाजप नाराज आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये सत्ता स्थापन होईल असं वाटत नाही. त्यामुळे 9 नोव्हेंबरपूर्वी सत्ता स्थापनेची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राष्ट्रपती राजवट लागणार नाही असा भाजपला विश्वास आहे. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चांमध्ये मंत्रिमंडळात  निम्मा निम्मा वाटा ठरला होता. त्याचा अर्थ मुख्यमंत्रिपद होत नाही असंही भाजपकडून सांगण्यात येतेय. निवडणुकीत पराभूत झालेल्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होवू शकतो मात्र निर्णय दिल्लीत होणार आहे. शिवसेनेमुळे भाजपच्या 12 ते 15 जागा पराभूत झाल्यात असं भाजपला वाटतं. निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत केली असंही भाजपला वाटत असून त्याचा फटका बसल्याचं सांगितलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...