माणसं जातीने नाही कतृत्वाने मोठी होतात, भाजप नेत्याचा पंकजा मुंडेंना खोचक टोला

माणसं जातीने नाही कतृत्वाने मोठी होतात, भाजप नेत्याचा पंकजा मुंडेंना खोचक टोला

ओबीसी हे कोणा व्यक्तीच्या मागे नाही तर ओबीसी पक्षाच्या मागे आहेत. त्यामुळे आम्ही पंकजांवर नाराज नाही असं बावनकुळे म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर :  गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा घेत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आक्रमक भाषण केलं. त्यांच्या या भाषणामुळे ओबीसी नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण आम्ही कोणीही नाराज नसून माणसं जातीने नाही तर कतृत्वाने मोठी होतात असं म्हणजे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजांना टोला लगावला आहे.

ओबीसी हे कोणा व्यक्तीच्या मागे नाही तर ओबीसी पक्षाच्या मागे आहेत. त्यामुळे आम्ही पंकजांवर नाराज नाही असं बावनकुळे म्हणाले. पक्ष सत्तेत नसल्यामुळे जातीचं राजकारण होतं आहे. पण आम्ही सगळे एकत्र आहोत आणि पक्षाच्या सुधारणेसाठी काम करत असल्याचंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. एका मराठी वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

इतर बातम्या - पंकजा मुंडेंना मुठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही तर..., भाजप नेत्याचा घणाघात

दरम्यान, 'पंकजा मुंडें यांनी भरवलेल्या मेळाव्यामुळे पक्षाला कोणताही धोका होणार नाही. ज्याला स्वत:चा मुठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही. त्याच्यामुळे पक्षाला काय धोका होणार' अशा शब्दात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा घेऊन खदखद व्यक्त केली. 'पक्ष माझ्या बापाचा आहे, असं मी का म्हणू नये. मी बंडखोरी का करू? मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे,' असं त्या म्हणाल्या होत्या. त्यावर एका मराठी वृत्तवाहिणीला प्रतिक्रिया देताना संजय काकडेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.

'पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी पक्षात काही काम केलं नाही. त्यांना साधा त्यांचा मतदारसंघ सांभाळता आला नाही. त्यांना एवढी पदं देऊन 30 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे त्यांनी पक्षाला याचा दोष देऊ नये' असं संजय काकडे म्हणाले. गोपीनाथ मुंडे हे अवघ्या देशाचं नेतृत्त्व आहे. पण पंकजा मुंडेंनी जातीपातीचं राजकारण केलं. 5 वर्षांत पंकजांनी ओबीसींना सांभाळलं नाही. 5 वर्ष सत्तेत होत्या तरी कामं का केली नाहीत? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला.

BREAKING: महाराष्ट्रात राजकीय तांडव, राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या नेत्यांची घरवापसी?

पंकजा मुंडे यांच्या कालच्या भाषणामुळे भाजपच्या सच्चा कार्यकर्त्याला आणि गोपीनाथ मुंडेंना मानणाऱ्या वर्गाला याचं दु:ख झालं असणार. 'मला काढायचं असेल तर पक्षाने निर्णय घ्यावा' या वक्तव्याने मला अतिशय वाईट वाटल्याचं संजय काकडे यांनी या मुलाखतीत बोलून दाखवलं आहे.

दरम्यान, 'पंकजा मुंडे यांनी 5 वर्षात काही केलं नाही. कालच्या मेळाव्यामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या आदरासाठी सगळे नेते हजर राहिले. पंकजा मुंडेंसाठी नाही. पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना आणि पक्षाला सोडून कार्यक्रम भरवावा आणि मग त्यात कोण उपस्थित राहत ते पाहा' असं खुलं आवाहनही संजय काकडे यांनी यावेळी केलं. त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर आता पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मोठी बातमी - हैदराबाद बलात्कार, हत्या प्रकरणी आला पीडितेच्या जळालेल्या मृतदेहाचा DNA रिपोर्ट

Published by: Renuka Dhaybar
First published: December 13, 2019, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading