आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही, चंद्रकांत पाटलांच्या नव्या दाव्याने राजकीय खळबळ

भाजपला सोबत घेतल्यानंतर कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : गेल्या 2 दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या 3 बैठका पार पडल्या. यातून भाजपच सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भाजपला सोबत घेतल्यानंतर कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. भाजपची राज्याची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपला एकूण संख्याबळ 105 आहे. त्यात 14 अपक्ष सहयोगी त्यामुळे एकूण असे 119 आमदार भाजपकडे आहेत. त्यामुळे भाजपला सोबत घेतल्याशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपच्या कालपासून 3 बैठका पार पडल्या. यामध्ये आमदार, अपक्ष आणि विधानपरिषद अशा विषयांवर चर्चा झाली. यावेळी भाजपचं सरकार येणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप आहे. भाजपला विधानसभेत सगळ्यात जास्त म्हणजे 1 कोटी 42 लाख मतं मिळाली, दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला 90 लाख मतं मिळाली. त्यामुळे भाजपच एक नंबरचा पक्ष असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

यावेळी भाजपने 164 जागा लढल्यानंतर 105 जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये महिला आमदारांची संख्या जास्त असल्याचंही पाटील यांनी म्हटलं. दरम्यान, ज्या ठिकाणी भाजपने जागा हरल्या त्या 59 जागांपैकी 55 जागांवर भाजप नंबर 2 वर आहे. 26 आयारामांपैकी 16 विजयी झाले. त्यामुळे या सगळ्याच भाजप हाच महाराष्ट्रातला मोठा पक्ष आहे. इतर कोणत्याही पक्षाला 100 हून अधिक आमदार जिंकता आले नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

इतर बातम्या - भाजपला सत्ता गमावण्याचा धोका, शिवसेना पालिकेत वापरणार महाशिवआघाडी पॅटर्न?

दरम्यान, या बैठकीत राज्यातल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यावरही चर्चा करण्यात आली. प्रत्येक मतरारसंघात नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करा अशा सुचना भाजप नेत्यांना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना 23 हजार कोटी विमा कव्हरेज देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी माफी मागो

राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. राहुल गांधी राफेल प्रकणावर लोकसभा निवडणूक लढली. त्यांवी सुप्रीम कोर्टात माफी मागितली. पण त्यांनी जगभरात देशाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी. यासाठी राहुल गांधी माफी मागो असं भाजपकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

First Published: Nov 15, 2019 04:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading