मुंबई, 12 ऑगस्ट : 'राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत जी जनतेला 'शॉक ' द्यायची तुम्हाला सवय आहे, मात्र जनता लवकरच तुम्हाला 'शॉक' देईल. जनता सर्वकाही बघतेय हे लक्षात ठेवा' अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांच्यावर टीका केली आहे. यासंबंधी चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं असून त्यातून सरकारवर टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांत वीज बिल वाढलं असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. पण वीज बिलात वाढ झाली नाही असं भाष्य नितीन राऊत यांनी केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटरद्वारे उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, 'एक बातमी वाचली की राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणत आहेत " वीज बिलं वाढलेली नाही , लोकांचा तसा समज झालाय." हे वाचून महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अत्यंत वाईट वाटले. हे जोडून तोडून तयार झालेले तिघाडी सरकार संपूर्णपणे नागरिकांप्रती असलेली आपली जबाबदारी विसरली आहे. '
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली नियुक्ती का?
'ऊर्जा मंत्री कदाचित परवा तुम्ही हे वाचलं नसेल की आपल्याच सरकारशी जोडलेले वसई विरार क्षेत्राचे आमदार आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना जे 5.5 लाख रुपये विजेचे बिल आले आहे ते भरण्यास त्यांनी नकार दिला. आश्चर्याची बाब म्हणजे हे बिल त्यांना बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालयाचे आले आहे.तसेच वसई विरार मधील नागरिकांना हितेंद्र ठाकूर यांनी आवाहन केले आहे की कोणीही असे चुकीचे वीज बिल भरू नका. नागपूर मध्ये एका इसमाने 40 हजार रुपये विजेचे बिल भरण्यास असमर्थ असल्याने दुर्दैवाने आत्महत्या केली. ही संपूर्ण शासन आणि प्रशासनासाठी लज्जास्पद आणि खेदजनक घटना होती . त्यांच्या कुटुंबाने विजेचे बिल कमी करण्याची विनंती देखील केली होती परंतु काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले.' अशी उदाहरण देत चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
वडील झोपेत घोरत होते म्हणून आला राग, मुलाने बापालाच पाठवलं मृत्यूच्या दारात
ते पुढे म्हणाले की, 'मंत्री मोहोदय, मी आपल्याला परत सांगू इच्छितो की ग्राहकांना 'शॉक' देणं बंद करा. जनतेने मोदी जी यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेस आणि राहुल गांधींना जो शॉक दिला आहे तो विसरू नका. येत्या काळात तो तुम्हाला परत महाराष्ट्रात नक्कीच अनुभवायला मिळेल. जनता सर्वकाही बघतेय हे लक्षात ठेवा....'