भाजप नेत्यानेच वाढवली नितेश राणेंची डोकेदुखी, कणकवलीमध्ये नवा ट्विस्ट

संदेश पारकर यांनी शिवसेना खासदार विनायक राउत यांची भेट घेऊन शिवसेना उमेदवार सतिश सावतं यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

उदय जाधव उदय जाधव | News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 02:28 PM IST

भाजप नेत्यानेच वाढवली नितेश राणेंची डोकेदुखी, कणकवलीमध्ये नवा ट्विस्ट

कणकवली, 07 ऑक्टोबर : कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण नितेश राणे यांच्याविरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी हुनूमान उडी मारत थेट शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या काही वेळातच संदेश पारकर हे त्यांचा उेमदवारी अर्ज मागे घेणार आहेत. त्यासाठी ते कणकवली निवडणूक कार्यालयात पोहचत आहेत. त्यामुळे आता नितेश राणेंविरोधात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

संदेश पारकर यांनी शिवसेना खासदार विनायक राउत यांची भेट घेऊन शिवसेना उमेदवार सतिश सावतं यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेची ताकत वाढली आहे. सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. गेली 24 वर्ष ते नारायण राणेंचे सहकारी होते. मात्र नितेश राणे यांच्या कामाच्या पद्धतीमुळेच आपण पक्ष सोडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. राणेंचा आपल्यावर विश्वास राहिला नाही असंही त्यांनी सांगितलं होतं.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही राणेंनी शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या विरुद्ध निलेश राणेंना उभं केलं होतं. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्याचाह राग शिवसेनेला असून राणेंना सहकार्य करण्याची त्यांची भूमिका नाही.

इतर बातम्या - 'भाजपने आम्हाला धोका दिला', विधानसभेसाठी महादेव जानकरांनी जाहीर केली भूमिका

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीच मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेतून युतीला बंडखोरीचा सामाना करावा लागत आहे. कणकवलीमध्ये भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे कोकणातल्या कणकवलीत पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगाणार आहे.

Loading...

इतर बातम्या - RBI चा मोठा निर्णय; ATMमधून नाही निघणार 2000 रुपयांची नोट, कारण...!

अखेरच्या दिवशी भाजपने नितेश राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देत AB फॉर्म दिला. राज्यात युती असली तरी कणकवलीत मात्र 'युती' तुटल्यातच जमा आहे. कारण, भाजपचे उमेदवार असलेले नितेश राणे यांना कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी राणेंना पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवसेनेने सतीश सावंत यांना पाठिंबा देत AB फॉर्म दिला आहे. AB फॉर्म दिल्यामुळे ते सेनेचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. सतीश सावंत हे काही दिवसांपूर्वीच राणेंच्या स्वाभीमान पक्षातून बाहेर पडले होते. त्यामुळे ही लढत चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्र हादरला! भाजप नेत्यासह कुटुंबावर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे असं एक समीकरणच कोकणच्या राजकारणात झालं होतं. 34 वर्षं शिवसेनेत राहिलेल्या आणि मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, मंत्री अशी महत्त्वाची पदं मिळालेल्या नारायण राणेंनी 2005 साली शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत राणेंनी शिवसेनेच्या परशुराम उपरकरांचं डिपॉझिट जप्त करुन दाखवलं.

त्यानंतर 2009 च्या निवडणुकांआधी मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि राणेंचा मालवण कणकवली मतदार संघ विभागला जाऊन कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यांचा एक मतदारसंघ झाला . कणकवलीच्या जागी मालवणला कुडाळ तालुका जोडला गेला आणि मालवण कुडाळ तालुक्यांचा दुसरा मतदारसंघ तर सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले तालुक्यांचा तिसरा विधानसभा मतदारसंघ झाला .

बदललेल्या कणकवली मतदारसंघात राणेंनी आपल्या जागी त्यांचे मुंबईतले समर्थक रवी फाटक यांना काँग्रेसकडून मैदानात उतरवलं आणि स्वत: मालवण कुडाळ मतदारसंघ निवडला. याच काळात राणेंबद्दल सिंधुदुर्गात नाराजीचं वातावरण वाढू लागलं. फाटक याना राणेंनी तिकीट मिळवून दिल्यामुळे राणेंचे कट्टर समर्थकही दुखावले गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...