जितेंद्र आव्हाडांवर भाजपचा घणाघाती हल्ला, पण राज ठाकरेंच्या मनसेने घेतली वेगळीच भूमिका

जितेंद्र आव्हाडांवर भाजपचा घणाघाती हल्ला, पण राज ठाकरेंच्या मनसेने घेतली वेगळीच भूमिका

राज ठाकरे यांच्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने या प्रकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेनं सगळेच अचंबित झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 9 एप्रिल : महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट घोंघावत असताना ठाण्यातील तरुणाने राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या मारहाणीच्या आरोपानंतर राजकीय वाद सुरू झाला. या वादात भाजपनेही उडी घेत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. तर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली. मात्र राज ठाकरे यांच्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने या प्रकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेनं सगळेच अचंबित झाले आहेत.

मनसेच्या कार्यकर्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या कथित मारहाणीचं जोरदार समर्थन केलं आहे. 'अरे काहीही पोस्ट, कॉमेंट काही करणार का...सोशल मीडिया आहे... आपल्या विकृतीचे साधन नाही हो...चांगले घ्या की सोशल मधून...बर विकृती करायला हात ,मन धजावते कसे...मंत्री असो ,सेलिब्रिटी असो की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता ,पदाधिकारी याने पोस्ट, कमेंट विकृत करूच नये आणि केली तर विकृतीप्रमाणे मार खावा. जितेंद्र आव्हाड यांच्या बाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारले असेल तर चांगलेच केले असे विकृत ठेचले पाहिजे,' अशा आक्रमक शब्दांत रुपाली पाटील ठोंबरे यांनी आव्हाडांचं समर्थन केलं आहे.

'सोशल मीडियावर ही विकृती संपवली पाहीजे करा सुरुवात...विकृत कमेंट करणाऱ्या माणसाला आता केस आणि मार दोघांचा सामना.. त्यात इज्जत गेली ती वेगळी.. कारण बदनामी फक्त महिलेची होती असे नाही तर पुरुषाची सुद्धा होते... तीही घरादारा सकट...कशाला हवी अशी विकृती जी सगळ्याचा सत्यानाश करेल. अजून ही वेळ गेली नाही ,वेळेत सुधारावे विकृत कमेंट करणाऱ्या भावानो,' असं आवाहनही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे केलं आहे.

काय आहे तरुणाचा आरोप?

'जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या संरक्षणासाठी असलेल्या सरकारी पोलिसांनी अभियंत्याला उचलून आणले आणि आव्हाड यांच्या बंगल्यावर आणून बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हे उपस्थित होते आणि त्यांच्यादेखत ही मारहाण केली गेली,' अशी तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. हा तरूण पेशाने इंजीनिअर असून तो संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे.

First published: April 9, 2020, 11:31 AM IST

ताज्या बातम्या