Elec-widget

विधानसभेसाठी भाजप पहिली यादी आज येणार, उमेदवारांची नावं निश्चित!

विधानसभेसाठी भाजप पहिली यादी आज येणार, उमेदवारांची नावं निश्चित!

दिल्लीत सोमवारी भाजपची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान नेरंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडणार आहे.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. जवळपास साडेचार तास चाललेल्या बैठकीमध्ये विधानसभा उमेदवारांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जवळपास एक तास बैठक झाली. त्यानंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचीदेखील जवळपास एक तास बैठक झाली. साडेसहा तासाच्या मंथनानंतर भाजपची पहिली यादी आज येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यावेळी विधानसभा रणांगणात उतरणार आहेत तर शिवसेना-भाजप युतीवरदेखील अंतिम निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीमध्ये युतीच्या फार्म्युल्यावरदेखील निर्णय घेण्यात आला असून शिवसेनाला 124 जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

काँग्रेसने रविवारी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. तर युतीमुळे काही जागांचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांनी गेल्या 5  वर्षात पक्षासाठी कामं केली नाही अशा 20 टक्के नेत्यांना भाजपकडून नारळ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अनेक दिग्गज नेत्यांची जोरदार इनकमिंग झाली. त्यामुळे भाजपने जर आयात नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजपमध्ये अनेकांमध्ये नाराजीचा सूर दिसू शकतो. अशा वेळी आता भाजप काय खेळी खेळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, रविवारी शिवसेनेकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यात आले. सेनेपाठोपाठ भाजपनेही संघटनमंत्र्यांना AB फॉर्मचं वाटप केलं आहे. राज्यातील 6 विभागात 6 संघटन मंत्र्यांना AB फॉर्म घेऊन जाण्याचा पक्षाकडून सूचनाही देण्यात आल्या आहेत. यादी जाहीर होताच उमेदवारांना तासाभरात फॉर्म मिळावेत यासाठी भाजपने ही व्यवस्था केली असल्याची माहिती आहे.

इतर बातम्या - ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात; आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर!

Loading...

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात निर्विवादपणे जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी दोन उमेदवार स्पर्धेत आहेत, अशा जागांची वेगवेगळी यादी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. भाजपच्या परंपरागत 117 जागांवर प्रथम चर्चा करण्यात असल्याची माहिती समोर आली. भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे उपस्थित होते.

संघटन मंत्री :-

मुंबई - सुनील कर्जतकर

कोकण ठाणे - सतीश धोंडे

उत्तर महाराष्ट्र - किशोर काळकर

मराठवाडा - भाऊराव देशमुख

विदर्भ - उपेंद्र कोठेकर

पश्चिम महाराष्ट्र - रवींद्र अनासपुरे

इतर बातम्या - या मतदारसंघात युती तुटणार, शिवसेनेचा भाजप विरोधात एल्गार

शिवसेना-भाजप युतीचं या चार जागांवर अडलं घोडं, तोडगा निघताच होणार घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली तरी शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून अजून वाटाघाटी सुरूच आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक संपली आहे. शिवसेनेने केलेली 126 जागांची मागणी भाजपने फेटाळली आहे. शिवसेनेला 124 जागा देण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने 126 जागांची मागणी फेटाळल्यानंतर आता शिवसेना काय भूमिका घेते, याकडे संगळ्यांचे लक्ष लागले आहेत.

चार जागांवर युतीचं अडलं घोडं..

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळी (वर्धा), सावनेर (नागपूर), माण- खटाव (सातारा) आणि बेलापूर (नवी मुंबई) या चार जागांवर युतीचं घोडं अडलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये अद्याप वाटाघाटी सुरूच आहे. आता अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असून तोडगा निघताच युतीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या युतीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 07:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...