धुळे: अनिल गोटे यांचा आमदारकीचा राजीनामा, सुभाष भामरेंच्या विरोधात शड्डू ठोकला!

धुळे: अनिल गोटे यांचा आमदारकीचा राजीनामा, सुभाष भामरेंच्या विरोधात शड्डू ठोकला!

धुळे महानगरपालिकेपासून नाराज असलेल्या गोटे यांनी अखेर आज आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.

  • Share this:

धुळे, 08 एप्रिल: आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या सदस्यत्व आणि आमदारकीचा आज सोमवारी राजीनामा दिला आहे. धुळे महानगरपालिकेपासून नाराज असलेल्या गोटे यांनी अखेर आज आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. गोटे उद्या लोकसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

आपण आजही मोदीचे समर्थक असून आपला केवळ मोदींच्या नावाने वाईट उद्योग करणाऱ्यांना विरोध असल्याचे गोटे यांनी सांगितले. आमदारकीचा राजीनामा देताना गोटे यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील गंभीर टीका केली. पक्षातील राजकारणाचा कंटाळा आल्याचे आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही असे देखील ते म्हणाले. गोटे यांनी याआधी अनेक वेळा त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. आज गोटे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे.

धुळे पालिका निवडणुकीत सुभाष भामरे यांनी गोटे यांना बाजूला ठेवले होते. तेव्हापासून गोटे आणि भामरे यांच्यातील वाद टोकाला गेला. बंडखोरी करत असताना यापुढे आपले एकच लक्ष आहे ते म्हणजे सुभाष भामरे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता लोकसभा निवडणुकी भाजपचे अधिकृत आमदार भामरे यांच्याविरुद्ध त्यांनी लढण्याचे ठरवले आहे. त्यामुळे धुळे मतदारसंघात भामरे-गोटे-काँग्रेसचे कुणाल पाटील पाटील अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

धक्क्यांच्या मालिकेत काँग्रेससाठी दिलासा, अब्दुल सत्तारांचं बंड थंड झाल्याची माहिती

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. तसंच त्यानंतर त्यांनी आपण अपक्ष लढणार असल्याचंही जाहीर केलं होतं. पण आता अब्दुल सत्तार यांचं बंड शांत झालं असून ते पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करतील, अशी माहिती आहे.

भाजप प्रवेशाचीही होती चर्चा

अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती. पण त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्तार यांनी गिरीश महाजनांसह थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर अब्दुल सत्तारही आता भाजपच्या गोटात दाखल होणार का, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली होती.

वास्तविक सत्तार हे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण जागावाटपावेळी चव्हाण यांनी सत्तार यांच्या नावाचा विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज झाले.

VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

First published: April 8, 2019, 3:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading