एका युतीसाठी दोन नेते, दोन यात्रा; सगळ्यांच्या तोंडी भलतीच चर्चा!

एका युतीसाठी दोन नेते, दोन यात्रा; सगळ्यांच्या तोंडी भलतीच चर्चा!

शिवसेना-भाजप युतीत असले तरी दोघांनाही आपल्या पक्षाकडे लोक वळवण्याचा नैतिक राजकीय अधिकार आहे. तर एकीकडे 'दोस्ती पक्की, खर्चा अपना-अपना' तसं काहीसं सेना-भाजपचं झालं आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

औरंगाबाद, 30 ऑगस्ट : राज्यात सध्या सर्वच पक्षाच्या यात्रांनी राजकीय धुमाकूळ सुरू केला आहे. सर्वच पक्ष आपापल्या यात्रांना 'लोक जास्त प्रतिसाद देत आहेत' असा दावा ठोकत आहेत. शिवसेना-भाजप युतीत असले तरी दोघांनाही आपल्या पक्षाकडे लोक वळवण्याचा नैतिक राजकीय अधिकार आहे. आणि दोन्ही पक्ष यात्रेच्या माध्यमातून ते करत आहेत. मात्र, संधी मिळेल तिथं दोघेही एकमेकांवर हल्ला करण्याची संधी सोडत नाही.

विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच सेना-भाजपने आपआपल्या यात्रेच्या माध्यमातून राज्यावर वर्चस्व निर्माण केलं आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेत तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सेनेचे युवराज आदित्य ठाकरे हेसुद्धा जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून लोकांना आपले मुद्दे पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपच्या तुलनेत सेनेच्या यात्रेला थोडा प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सेनेच नाव न घेता भाजपच्या यात्रेला प्रतिसाद मोठा आणि इतरांच्या यात्रेत लोकच येत नाहीत असा दावा करतात. तर आदित्य ठाकरे म्हणतात, 'माझ्या यात्रेपेक्षा इतर यात्रेला लोकांचं प्रेम मिळत नाही'

यात्रा घेऊन निघायचं म्हणजे राज्यभर फिरावं लागतं. सेना-भाजप या ठिकाणीही एकमेकांचा उल्लेख न करता कोण किती फिरतंय याचा दावा करतात. मुख्यमंत्री मुक्कामी असलेल्या ठिकाणाहून रोज सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात ते किती किलोमीटर फिरले. तर आदित्य ठाकरेही 'मी किती किलोमीटर फिरलो हे मोजत नाही' असं सांगतात. तर 'मी लोकांच्या अडचणींचे निवेदन घेतो. लोकांच्या अडचणींचा आकडा खूप मोठा आहे' असा दावा ते करतात.

इतर बातम्या - मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या विनोद पाटलांना आदित्य ठाकरेंची स्पेशल ऑफर!

या सगळ्या गोष्टी ऐकल्या किंवा बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल आपआपल्या पक्षाचा दावा केलाच पाहिजे. पण असं असलं तरी भाषणाच्या शेवटी दोघांपैकी कुणीही म्हणत नाही 'युतीला तुमचा आशीर्वाद आहे का? युतीचा झेंडा विधानसभेवर फडकणार का?' त्याउलट मुख्यमंत्री पूर्ण जोशात म्हणतात 'माझ्यावर तुमचा आशीर्वाद आहे का?' तर आदित्य ठाकरेसुद्धा म्हणतात 'माझ्यावर तुमचा आशीर्वाद आहे का?'

इतर बातम्या - पीडितेच्या मृत्यूनंतरही 4 नराधम मोकाट, कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी दिला नकार!

महाजनादेश यात्रेचा शेवट मुख्यमंत्री मोठ्या जोशात करतात. सेनेचे युवराज आदित्य ठाकरेसुद्धा शेवटी जोशात लोकांचं मत विचारतात. दोघेही स्वतःच्या पक्षासाठी दावे करतात. मग, सेना-भाजपची युती होणार की नाही ? ही चर्चा होणं साहजिकच आहे. ते म्हणतात ना 'दोस्ती पक्की, खर्चा अपना-अपना' तसं काहीसं सेना-भाजपचं झालं आहे.

 भिडे गुरूजी पडले उदयनराजेंच्या पाया, पाहा हा VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: August 30, 2019, 9:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading