Home /News /news /

मारहाणीचा बदला मारहाणीने, पुण्यात 20 ते 25 भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला, प्रचंड राडा

मारहाणीचा बदला मारहाणीने, पुण्यात 20 ते 25 भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला, प्रचंड राडा

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आप्पा जाधव यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आप्पा जाधव यांच्या नारायण पेठेतील कार्यालयात हा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    पुणे, 25 मे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आप्पा जाधव यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आप्पा जाधव यांच्या नारायण पेठेतील कार्यालयात हा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या हल्ल्यामुळे कार्यालयात मोठा राडा झाला. आप्पा जाधव यांच्या कार्यालयावर 20 ते 25 जणांनी हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शहरध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. "नुकसान केली आहे. तोडफोड केली आहे. त्याचबरोबर आप्पा जाधवांच्या गळ्यातील चैन हिसकावली, असं प्राथमिक दर्शनी दिसतंय. पण आम्ही भाजपच्या चंद्रकात पाटील आणि जगदीश मुळीक यांच्या अधिकृत घोषणेची किंवा त्यांच्या प्रेसनोटची वाट पाहतोय", असं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं. "मारहाण करणाऱ्यांमधील संतोष कांबळे हा भाजपचा माथाडी सेनेचा पुणे शहराचा माजी प्रमुख आहे. तो आता भाजपमध्ये कुठल्याही विद्यमान पदावर नाही. त्यामुळे ही घटना आंबेकरांशी संबंधित आहे की चोरीच्या उद्देशाने मारहाणीशी संबंधित आहे, वैयक्तिक वैयमनस्यातून आहे का? याबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी जर सांगितलं की आरोपींशी भाजपचा कोणताही संबंध नाही तर आम्हाला पुरेशी राजकीय संस्कृती बिघडू द्यायची नाही. पण त्यांनी ही भूमिका स्वीकारली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज रात्रीपासूनच आक्रमक भूमिका घेईल", असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला. भाजपकडून विनायक आंबेकरांच्या मारहाणीचा बदला आप्पा जाधव यांच्या कार्यालयावरील हल्ल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दांमध्ये कविता शेअर केल्याने आप्पा जाधव यांनी त्यांना मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद केला होता. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्याच घटनेचा बदला आता भाजकडून घेण्यात आल्याची चर्चा आता सुरु आहे. पण या घटनेवर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. आप्पा जाधव यांनी याआधी भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर आप्पा जाधव यांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीनंतर आप्पा जाधवांनी जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरुन धाव घेतली, अशी माहिती समोर आली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या